03:15pm | Apr 29, 2021 |
(प्रकाश राजेघाटगे)
पुसेगाव: बेड मिळाला नाही म्हणून खचून न जाता करोनाशी लढणार आणि जिंकणार असा सकारात्मक विचार करून घरीच उपचार घेत काटेवाडीतील 13 जणांनी करोनावर मात केली. काटेवाडीतील एकजण बाधित झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तीची अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात 13 जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभाग जागे झाले. दुसर्या दिवशी पुन्हा 80 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात पाच व्यक्ती बाधीत निघाल्या. 400-450 लोकसंख्या असलेल्या गावात 29 जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
ज्यांना शक्य होते त्यांनी खासगी दवाखान्याकडे धाव घेतली. मात्र पाहिल्या 13 बाधितांना धडपड करूनही करोना सेंटरला बेड मिळाला नाही. खासगी दवाखान्यात जाण्यासारखी आर्थिक स्थिती नसल्याने अखेर त्यांनी घरीच राहून औषधोपचाराचा निर्णय घेतला. 55 ते 65 वयोगटातील या रुणांना इतरही आजार असल्याने घरी उपचार घेताना या रुग्णांच्या मनामध्ये भिती होती. त्यातच गावातील दोन रुग्ण दगावल्यामुळे घरीच उपचार घेणारे रुग्ण तणावाखाली होते.
सरपंच बाळासाहेब जगदाळे, उपसरपंच विकास पांडेकर, ग्रामसेविका शारदा कांबळे, गणेश कचरे, पृथ्वीराज पांडेकर, आरोग्य सेविका सोनाली सस्ते, अंगणवाडी सेविका मनिषा काटकर, आशा जगदाळे, शुभांगी कर्णे आदींनी तुम्हाला काहीही होणार नाही, आम्ही आहोत, असा धीर देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत होते. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. युनुस शेख, डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.माधुरी पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भीमाशंकर कांबळे, आरोग्यसेविका सोनाली सस्ते व वेटणे उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी भेटी देऊन रूग्णांच्या तपासण्या करून औषधोपचार करत होते. या रूग्णांना इतरही आजार असताना आणि एचआरसीटी स्कोर 5 पर्यंत असताना सकारात्मक विचार आणि योग्य औषधोपचार घेऊन मोठ्या धीराने करोनाशी दोन हात केले.
आत्मविश्वासाच्या बळावर घरीच राहून सर्व उपचार घेतले तर शंभर टक्के बरे होता येते. हे त्यांनी सिद्ध केले. डॉ. भीमाशंकर कांबळे यांनी तपासणी करुन कोरोनामुक्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |