02:08pm | Sep 11, 2020 |
पुसेगाव: सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करणे ही सेवागिरी देवस्थान ट्रस्टची नैमित्तिक बाब आहे. पण वर्षानुवर्षे सातत्याने सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांत हिरीरीने सक्रीय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीने लोककल्याणाचा वसा घेतलेल्या या ट्रस्टने कोरोनाच्या महामारीत पुसेगाव व परिसरातील डॉक्टर्सना वैद्यकीय सुरक्षा उपकरणांचे किटस देऊन, गावात वेळोवेळी औषधफवारणी करणे तसेच कॉरंटाईन केलेल्या येथील सर्व लोकांना भोजनाबरोबरच त्यांना औषधेही उपलब्ध करुन दिली आहेत.
कोरोना कालावधीत आपल्याकडील दोन रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिमतीला दिली असून पुसेगाव व परिसरातील कोरोना रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी ट्रस्टची दुसरी रुग्णवाहिका व तिचा चालक सातत्याने झटत आहेत. एकूण कोरोनाच्या या लढाईत श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट श्रीमद्भगवद गीतेतेतील निष्काम कर्माचा वसा घेऊन खर्या अर्थाने कोरोना योध्द्याची भूमिका पार पाडत आहे.
कोरोना प्रसाराच्या सुरुवातीच्या काळापासूनच ट्रस्टने या युध्दात सहभाग घेऊन पुसेगाव व परिसरातील लोकांना मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव व सुरेशशेठ जाधव यांच्या हस्ते गोरगरीब व हातावर पोट भरणार्या कुटूंबाना अन्नधान्याचे व मास्कचे वाटप करण्यात आले. वेळोवेळी गावात जंतू नाशकांची फवारणी करण्यात आली. तसेच अंगणवाडी सेविका व आशा यांना मास्क, ग्लव्हज तसेच पुसेगाव व परिसरातील सर्व डॉक्टर्सना कॅप, मास्क, गॉगल, गाऊन, पँट, ग्लव्हज या वैद्यकिय सुरक्षा उपकरणाचे वाटप करण्यात आले. गेली पाच महिने पुसेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींना ट्रस्टतर्फे भोजन व औषधे देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी साडेतीन लाख रुपयांचा निधी दिला आहे.
ट्रस्टकडील दोन रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका ट्रस्टने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध केली असून ट्रस्टतर्फे परिसरातील कोरोना रुग्णांची माहिती मिळताच सेवेसाठी दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येत आहे. ट्रस्टच्या रुग्णवाहिकेच्या चालकाला नुकतीच कोरोनाबाधा झाल्याने सेवागिरी ट्रस्टचे विश्वस्त प्रताप जाधव यांनी स्वतः रुग्णवाहिकेचा वाहनचालक म्हणून ताबा घेतला असून पुसेगाव व परिसरातील कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी व मृतव्यक्तींची ने-आण करण्यासाठी ते स्वतः हिरीरीने सहभागी झाले आहेत.
अंत्यविधीवेळी कोरोनाबाधीत मृत व्यक्तीला स्पर्श करण्यासाठी लोक तयार नसल्याने प्रताप जाधव व ट्रस्टचे कर्मचारी मदतीला धावून जात आहेत. जलसंधारण, वृक्षसंवर्धन, येरळा खोलीकरणासारख्या उपक्रमांचे आयोजन करणार्या तसेच वर्षभर विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांबरोबरच श्री सेवागिरी महाराजांच्या यात्राकाळातही ट्रस्टद्वारे जनकल्याणाचे उपकम राबविले जातात. शासन, प्रशासन अथवा अन्य संस्थांच्या कोणत्याही मदतीची अथवा पुरस्काराची अपेक्षा न धरता शासनाच्या सर्व उपक्रमात सहभागी होणारी सेवागिरी ट्रस्ट सामाजिक व लोककल्याणाच्या उपक्रमात सदैव अग्रेसर असते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |