11:05pm | Jun 04, 2020 |
सातारा : पोवईनाका परिसरात बहुचर्चित टी अँड टी इन्फ्रास्क्टचर कंपनीचे ग्रेडसेपरेटरचे काम सुरु आहे. काम सुरु झाल्यापासून गेल्या दोन वर्षात कंपनीच्या जेसीबींकडून दोन ते तीन वेळा सातारा शहर व उपनगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. अशा प्रकारे जलवाहिनी फुटल्यानंतर अर्ध्या सातारा शहरासह उपनगरांना पाण्यापासून वंचित रहावे लागते. मे महिन्यात देखील अशाच प्रकारे मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्याला दोन आठवडे उलटत नाहीत तोवरच सायन्स कॉलेजसमोर कंपनीच्या कामात जलवाहिनी फुटल्याने सातारकरांना दोन दिवस पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी सातत्याने झटणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे अधिक्षक अभियंता संजय गायकवाड 31 मे रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांच्यानंतर साताऱयात येण्यासाठी स्पर्धा सुरु झाली असली तरी संजय गायकवाड यांनी दोन वर्षात केलेले काम ते करतील की नाही अशी साशंकता आहे. मे महिन्यात अशाच प्रकारे ग्रेडसेपरेटच्या कामात मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी गायकवाड यांनी तातडीने ते काम करण्याबाबत सूचना करुन दुरुस्ती करुन घेतली होती.
या घटनेस काही दिवस उलटत नाही तोवर गुरुवारी ग्रेड सेपरेटरचे काम सुरु असतानाच सायन्स कॉलेजनजिक ओढय़ातून शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे नियमित होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांचे मार्फत तातडीने पाईप दुरुस्ती काम सुरू केले आहे. मात्र, मुळातच ग्रेडसेपरेटचे काम सुरु असताना जलवाहिनी कोठून गेली आहे याबाबत प्राधिकरणाकडून टी अँड टी ला कल्पना दिली गेली नव्हती का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरवेळी मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर ती दुरुस्त करण्याचे काम बांधकाम विभागाकडून मात्र प्राधिकरणाचे ठेकेदार करत असतात.
काळजी घेण्याचे का टाळले जाते ?
ग्रेडसेपरेटचे काम महत्वाचेच आहे. मात्र, ते काम करताना रस्त्यात असलेल्या जलवाहिन्या फुटू नयेत याची दक्षता घेण्याचीही गरज आहे. एकतर उपनगरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक वैतागलेले आहेत. जुन्या योजनेमुळे उपनगरात वारंवार पाईप फुटतच असतात. दुरुस्ती ठेकेदारांना मग काम मिळत राहते. मात्र यात किती पैसा व्यर्थ जातो हे दर महिन्याला न चुकता वेतन घेणाऱया अधिकाऱयांना कळत नाही. टी अँड टी कंपनी देखील जलवाहिनीनजिक काम करता काळजी का घेत नाही असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस जीवन प्राधिकरणाची शुद्ध पाणी पुरवठा करणारी फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीस तब्बल 30 पेक्षा अधिक तास लागणार आहेत. तसेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दि. 4 व 5 जून रोजीचा नियमित पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन असे सहाय्यक कार्यकारी अभियंता पल्लवी चौगले यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |