04:09pm | Jan 12, 2021 |
बुध: जिल्हयाबरोबर खटाव तालुक्यातही सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान चालू असताना भुरकवडी (ता.खटाव) येथे मात्र नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करून भुरकवडी ग्रामस्थांनी एकीच्या जोरावर षटकार मारून सलग 6 व्यांदा ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करून महिलाराज देण्याचा यशस्वी प्रयोग राबवून महाराष्ट्र राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
शरदचंद्रजी पवार यांनी राज्यातील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून महाराष्ट्रात पहिले महिला धोरण आणत महिलांना 33 टक्के आरक्षण दिले आहे. शरद पवार यांच्या विचारधारेवर चालत असताना भुरकवडी ग्रामस्थांनी मात्र ग्रामपंचायतमध्ये सात महिला सदस्यांची बिनविरोध निवड केली आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ललीता छगन कदम, मनिषा दत्तात्रय कदम, शितल किरण कदम, रेश्मा सचिन कदम, रंजना मधुकर कदम, सुजाता हणमंत गाढवे तर सुलोचना चंद्रकांत कुंभार यांची निवड केली आहे.
गावामध्ये महिला पदाधिकारी म्हणून सोसायटीच्या संचालिका सुशिला भिकाजी कदम, सुलोचना बबन पवार काम पहात आहेत तर अधिकारी म्हणून ग्रामसेविका धनश्री गमरे, आरोग्य सेविका जंगम मॅडम, प्राथमिक शाळेच्या दोन महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका शुभांगी कदम, मनिषा चव्हाण, मदतनीस सुमन कदम, रंजना कुंभार, आशासेविका रेश्मा फडतरे, सिमा जाधव काम पहात आहेत.
1995 सालापासून (कै.) गणपतराव कदम (आबा) कै. रामभाऊ पाटील यांच्या व ग्रामस्थांच्या कल्पतेतून आजही 2021 पर्यंत ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचा इतिहास कायम ठेवत 2021 पर्यत सलग 30 वर्ष ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबरोबर सात ही महिला सदस्य देण्याचा निर्णय एकमुखाने निर्णय घेण्यात आला. या बिनविरोध निवडीकामी गावातील ग्रामस्थांबरोबर महिला वर्ग, तरूण वर्गानेही उत्स्फूर्तपणे भाग घेऊन राज्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |