06:11pm | Dec 03, 2021 |
कराड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत सोहळा रविवार दि.५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या सोहळ्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील १२२७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे, की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील जनतेला मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी सन १९८२ साली कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर १९८३ साली कृष्णा नर्सिंग विज्ञान संस्थेची व १९८४ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. २००५ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला. स्व. जयवंतराव आप्पांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या डॉ. सुरेश भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कृष्णा अभिमत विद्यापाठाचा नावलौकिक पोहचविला आहे.
कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून नागरिकांना पुरविल्या जाणार्या या उच्च गुणवत्ताप्राप्त आरोग्य सोयीसुविधांमुळेच विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘ए+’ श्रेणीचे अव्वल मानांकन, तसेच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाशी संलग्न असणार्या कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राला ‘एनएबीएच’चे राष्ट्रीय मानांकन लाभले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील बालरोग विभागाच्या अतिदक्षता कक्षाला भारतीय राष्ट्रीय नवजात मंचाचे (नॅशनल निओनॅटल फोरम ऑफ इंडिया) मानांकन मिळाले आहे. रूग्णालयाच्या रक्तपेढीला ‘एनएबीएच’ या राष्ट्रीय संस्थेचे मानांकन लाभले असून, कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रोगनिदान प्रयोगशाळेलाही ‘एनएबीएल’ या राष्ट्रीय संस्थेकडून मानांकन मिळाले आहे.
गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन पद्धती, एकाच छताखाली उपलब्ध असलेली उच्च शैक्षणिक सुविधा आणि बहुवैशिष्ट्यपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल ख्यातकीर्द असणार्या कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या यंदाच्या १० व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (४७६), नर्सिंग (२९७), दंतविज्ञान (१८४), फिजिओथेरपी (१२८), अलाईड सायन्स अधिविभाग (८०) आणि फार्मसी (६२) अशा सहा अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या एकूण १२२७ विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान केली जाणार आहे. यापैकी ८ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |