08:45pm | Sep 09, 2021 |
कराड : कराड शहरात मोबाईल शॉपी फोडून १६ मोबाईल चोरी करणार्या सराईत चोरट्यास गुरुवारी कोल्हापूरातील राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. संशयित संभाजी राजू कांबळे (वय २२, रा. मुंढे, ता.कराड) असे त्याचे नाव आहे.
त्याच्या अंगझडतीमध्ये १६ किंमती मोबाईल मिळून आले. त्यांची बाजारभावाप्रमाणे २ लाख २ हजार ६०० रुपये किंमत आहे. संशयित कांबळे हा सराईत चोरटा असून त्याचा कराड पोलीस शोध घेत होते. त्याला कोल्हापूर पोलीसांनी कराड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे, अशी माहिती कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चालु वर्षी गणेशोत्सव सण साजरा होत असून पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली राजारामपूरीचे पोलीस निरीक्षक वाय. डी. वोमासे यांच्या आदेशाने सदर उत्सवाच्या आदेशाने व इतर वेळी राजारामपूरी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार हिस्ट्री शिटर मालाविरुध्द व शरिराविरुध्द गुन्हे करणार्या मोटारसायकल, चोर व मोबाईल चोर यांना तपासून अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत, याची दक्षता घेवून हद्दीत पेट्रोलिंग करण्यासाठी गुन्हेशोध पथकातील कर्मचार्यांना सूचना केल्या होत्या.
दरम्यान बातमीदारातर्फे माहिती मिळाली की, एक तरुण राजारामपूरी माऊली पुतळा याठिकाणी बॅगेतून मोबाईल विक्री करण्यासाठी घेवून आला आहे. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या हातामध्ये हॅन्डबॅग होती. त्याची झडती घेतली असता सोळा मोबाईल मिळून आले. पोलीसी खाक्या दाखविताच त्याने संभाजी राजू कांबळे असे आपले नाव असून कराड येथील साई मंदिरजवळील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरीची कबुली दिली. मोबाईल विक्री करीता माऊली पुतळा येथे आलो होतो असेही त्याने सांगितले. ही कारवाई हेडकॉन्स्टेबल समीर शेख, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे, सत्यजीत सावंत, विशाल शिरगांवकर, रवी आंबेकर आदींनी केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |