09:32pm | May 26, 2022 |
सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गोडोली जकात नाका परिसरातील दोन फळ गाडे आणि दोन टपऱ्या आज जप्त केल्या. या कारवाईमुळे संबंधित विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले. या अतिक्रमण कारवाई मोहिमेवर राजकीय दबाव टाकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. मात्र कारवाई सुरू राहील. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता पुन्हा खुला झाला आहे.
गोडोली परिसरामध्ये पालिकेने गेल्या दोन दिवसापासून अनधिकृत टपर्या आणि हातगाडी यांच्याविरोधात कारवाई गतिमान केली आहे. साईबाबा मंदिर ते गोडोली जकात नाका या दरम्यान असणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या टपर्या पालिकेने 24 तासापूर्वीच काढत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला होता. मात्र पथकाची पाठ फिरताच पुन्हा तेथे लगोलग टपर्या उभ्या राहिल्याने अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांच्या पथकाने पुन्हा एकदा गुरुवारी दुपारी जाऊन कारवाई केली. यावेळी दोन फळांच्या गाड्या आणि एक गुऱ्हाळाचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई थांबवण्यासाठी बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या. मात्र कारवाईचा अंक सुरूच राहिला. यामुळे संबंधित टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. काहींनी राजकीय नावे घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने माघार घेतली नाही. शुक्रवारी सदर बाजार परिसरात तसेच सातारा एसटी स्टँड परिसरात कारवाई होणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |