01:57pm | Jul 17, 2020 |
पुसेगाव: आज कोरोनामुळे सर्वच स्तरातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असताना काही शौकिन मात्र त्यांच्याच तालात मग्न असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील खटाव गावच्या हद्दीत हुसेनपूर नावाच्या शिवारात तसेच धारपुडी गावच्या हद्दीतील लवंगार मळा या शिवारात न्यायालयाचे बैलगाडी शर्यती बंदी आदेश असताना बेकायदा बिगर परवाना प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देऊन बैलगाडी शर्यती केल्याप्रकरणी तीन चारचाकी वाहनास चालक, मालक व शर्यतीचे आयोजक यांना पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भा.द.वि.स. 188 नुसार प्राण्यास निर्दयतेने वागविणे व प्रतिबंधक कायदा कलम 11(1) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 119 नुसार पुसेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटाव गावच्या हद्दीतील हुसेनपूर नावाच्या शिवारात बैलगाडी शर्यती होणार असल्याची माहिती पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके याना मिळताच त्यांच्यासह फिर्यादी पोलीस कर्मचारी सचिन जगताप, किरण देशमुख, पी.एस.आय. लोंढे, पोलीस कर्मचारी सरक, सहायक फौजदार श्री.जगताप यांनी सकाळी 9 च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली असता तेथे अनेक लोकांसह चार बैलगाड्या, वाहने दिसून आली. पोलिसांना पाहताच काही जणांनी बैलगाड्यासह पलायन केले. मात्र घटनास्थळी सापडलेल्या बोलेरो मक्सी पिकअप एम एच 50- 8151 चा मालक प्रशांत अशोक पवार (रा. वहागाव, ता.कराड), चालक विश्वजित विश्वास माळी (शिवडे, ता. कराड), एम एच 10 सी आर 4242 चा मालक प्रसन्न राजेंद्र देशमुख (रा.निसराळे), चालक खंडू श्रीरंग गुजले (रा. लेंगरे, ता खानापूर) यांना पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. बैलासह बैलगाड्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन इतरांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या शर्यतीचे आयोजन बैल मालकांनी आपापसात ठरवल्याचे संबंधित व्यक्तींनी पोलिसांना सांगितले.
तसेच सकाळी साडे अकराच्या सुमारास धारपुडी गावच्या हद्दीतील लवंगार मळा या शिवारात न्यायालयाचे बैलगाडी शर्यती बंदी आदेश असताना बेकायदा बिगर परवाना प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देऊन बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या बद्दल बोलेरो मक्सी पिकअप एम एच 11बी ऐल 6565 चा चालक मंगेश मोहन पवार (शिवथर ता. सातारा) बैल मालक सुरज दिलीप सुकुंडे (रा. अरबवाडी, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |