वाई : ओझर्डे, ता. वाई येथील एका लष्करी जवानाचा सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना मृत्यू झाला आहे. शहीद सोमनाथचे पार्थीव लवकर मिळण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत.
ओझर्डे, ता. वाई येथील सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) हे लष्करामधील सिग्नल या विभागामध्ये हवालदार या पदावर सिक्कीम येथील कॉलिंग पॉग येथील 10 किलोमीटर वर असणार्या बर्फाच्या टेकडीवर इतर दोघांबरोबर नेमणूकीस होते. पण दिनांक 8 रोजी बर्फाच्या या डोंगराळ भागाला वादळी वारा व पावसाने रात्री 3 वाजण्याच्या सुमारास झोडपून काढले. त्यात या जवानांचे तंबू उडुन गेले. त्यामुळे रात्रभर हे तिघेही भीषण थंडीत कुडकुडत बसले. त्यावेळी ओझर्ड तालुका वाई येथील रहिवासी असलेले जवान सोमनाथ अरविंद तांगडे हे चक्कर येऊन तेथील बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कॉलींग पाग येथील बरकपुर येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्या वर शस्त्रक्रिया केली गेली. पण तेव्हापासून ते कोमात गेले व आज दि 16 रोजी त्यांचा उपचारादरम्यान सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. त्यांचे शव सिक्कीम वरुन विमानाने पुण्यापर्यंत आणण्यासाठी ओझर्ड ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत.
शहीद सोमनाथचे पार्थीव लवकर मिळण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या आकस्मिक निधनाने ओझर्डे गावासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |