सातारा: केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नवीन योजनेंतर्गत पुढील 10 वर्षे कालावधीकरीता पशुसंवर्धन विषयाशी निगडीत विविध व्यवसयाचे पायाभुत विकास घडविण्यासाठी बँक कर्ज व कर्जदार स्वहिस्सा मिळून 15 हजार कोटी इतका निधी उभारण्यात येणार आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनामार्फत 125 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. पायाभुत सुविधा विकास निधी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.
पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत दुग्धप्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक पायाभुत सुविधा उभारणी, नवीन उद्योग, व्यवसाय किंवा अस्तित्वात असणारे उद्योगांचे बळकटीकरण, दुग्ध प्रक्रिया उत्पादने यामध्ये आईस्क्रिम, चीज, दुध पावडर, सुगंधित दुध किंवा इतर दुधाशी निगडीत सर्व उत्पादने निर्मितीचे युनिट, मांस प्रक्रिया उद्योग किंवा निगडीत सर्व उत्पादने, पशुखाद्य निर्मिती यामध्ये पशुखाद्य कारखाने, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रथिने, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा, लिंग विनिश्चित वीर्य मात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र व पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे वृद्धींगत व संवर्धन विषय प्रकल्प इत्यादी बाबींचा समावेश आहे.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व डेअरी विभागाचे http://dahd.nic.in या संकेतस्थळावर योजनेचे सविस्तर मार्गदर्शन सुचना प पात्र उद्योग व्यवसायाविषयी माहिती देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र व्यक्ती, व्यवसायीक संस्था, कंपनी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |