वाई : वाई तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण चौघांनी आत्महत्या केल्या. या घटनांनी तालुका हादरला आहे. बावधन येथे लग्न होत नसल्याने युवकाने, तर आजारपणाला कंटाळून वृद्धाने जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, भुईंज परिसरातील आणखी दोघा युवकांनी गळफास घेवून आत्महत्त्या केली आहे.
बावधन येथील प्रदीप गंगाराम पिसाळ (वय 30) याने आपले लग्न होत नसल्याने नैराश्यातून आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि.23)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रदीप पिसाळ यांनी भिरोबा मंदिराच्या पाठीमागे आत्महत्या केली. लग्न होत नसल्याने ते नेहमी नाराज असायचे. त्यातूनच नैराश्य आले होते. याच प्रकारातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची फिर्याद त्यांचे चुलते दत्तात्रय पिसाळ यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे.
बावधनमध्येच सोमवारी गावंदर शिवारात अच्युतराव पिलाजी महामुनी (वय 80) यांनी आजारास कंटाळून आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा संजय महामुनी यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.
भुईंज परिसरातील पांडवनगर व भीमनगर (भुईंज) या दोन ठिकाणी दोन युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. उमद्या वयातच त्यांनी जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही घटनांमागील कारण स्पष्ट झालेले नाही.
आसले गावच्या हद्दीत पांडवनगर येथील शिवराज शंकर डुबल (वय 21) या तरूणाने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली. तर भीमनगर भुईंज येथील राजेश पोपट भोसले (वय 30) याने अनवडी गावच्या हद्दीत हॉटेल पंचरत्न शेजारी शासकीय वनराई येथील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सपोनि आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शखाली या घटनांचा तपास भुईंज पोलिस स्टेशनचे हवालदार शिवाजी तोरडमल व पोलीस नाईक अतुल आवळे करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |