08:05pm | Nov 17, 2020 |
सातारा : उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशिर कारवाया करणार्या दोन टोळ्यांमधील एकूण सातजणांना हद्दपार करण्याचे आदेश प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिलेले आहेत. नूतन जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांची जिल्ह्यातील ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे.
उंब्रज व पाटण पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, मोठी दुखापत, दरोडा, गर्दी मारामारी करणार्या टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे (वय 25, रा. जाळगेवाडी, ता.पाटण,जि.सातारा.), सागरबंडा शंकर गायकवाड (वय 27 टोळी सदस्य, रा.उंब्रज, ता.कराड, जि.सातारा), सोन्या/शाहीद शब्बीर मुल्ला (वय 22 रा.उंब्रज, ता.कराड, जि.सातारा) रोशन/रोश्या अरविंद सोनावले (वय 21 रा.उंब्रज,ता.कराड, जि.सातारा) यांची टोळी तयार झाली होती. ते टोळीने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनही व यापूर्वी सन 2019 मध्ये त्यांना सहा महीने सातारा जिल्हा हद्दपार करुनसुध्दा त्यांनी हद्दपार कालावधी संपताच त्यांनी पुन्हा दोन गंभीर गुन्हे करुन समाजात दहशत,भितीचे वातावरण निर्माण केले होते. त्यांचेवर कारवाई करुनही त्यांच्या बेकायदेशीर हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. या टोळीतील चार इसमांना पुर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातुन एक वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश केला आहे.
तसेच उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत मारामारी, जळीत, शिवीगाळ, दमदाटी, करणार्या टोळीचा प्रमुख रणजित नथुराम सरगर (वय 23 टोळी प्रमुख रा. वाघेश्वर, ता.कराड, जि.सातारा), अक्षय उर्फ आप्पा अंकुश लोखंडे (वय 24 टोळी सदस्य रा.संजयनगर मसुर, ता.कराड, जि.सातारा), धिरज रघुनाथ जाधव (वय 30 रा. वाघेश्वर, मसुर, ता.कराड, जि.सातारा) यांना सुधारण्याची संधी देवूनही व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तणात सुधारणा झाली नाही. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. या टोळीतील तीन इसमांना पुर्ण सातारा जिल्ह्यातून सहा महीन्यांकरीता हद्दपारीचा आदेश केला आहे.
वरील इसमांना हद्दपार करणे बाबत जनतेमधुन मागणी होत होती. त्यांच्याकडून कराड व पाटण, सातारा, तालुका व सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून या टोळीतील प्रस्तावित दोन्ही टोळी मधील सात इसमांना हद्दपार करण्याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचेकडे त्यांचा हद्दपार प्रस्ताव सादर केले होते. त्यावर चौकशी व सुनावणी होवुन दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून वरीलप्रमाणे आदेश झालेले आहेत. वरील सुनावणी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पो.निरीक्षक आनंदसिंग साबळे व सहाय्यक पो. फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य ते पुरावे सादर केले.
या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरविणार्या, समाजात बेकायदेशीर कारवाया करणार्या टोळयांच्या विरुद्ध तडीपारची कारवाई सुरुच रहाणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |