09:42pm | Jan 25, 2022 |
सातारा : शब्द दिल्याप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. निवासस्थानी खासदार उदयनराजे यांनी महसूल व नगरपालिका प्रशासनाची बैठक घेऊन सातारा शहराच्या प्रवेशद्वारांना सुशोभित करण्याच्या दृष्टीने तसेच महामार्गावरील उड्डाणपूल व सेवा रस्ते यांचे अद्ययावतीकरण या दृष्टीने अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना दिल्या. या सूचनांचे प्रस्ताव तयार करून केंद्र व राज्य शासनास सादर केले जाणार आहेत व या प्रस्तावांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करणार असल्याचे उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, सातारा शहरातील वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, शिवराज चौक ठिकाणाहून सातारा शहरांमध्ये प्रवेश करण्यात येतो. यापैकी अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि वाढे फाटा या ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली राष्ट्रीय महामार्गाच्या जागेत पुण्याच्या धर्तीवर बगीचा, वॉकिंग ट्रॅक, व्हर्टिकल गार्डन, भाजी मंडई, पार्किंग, आर्टिफिशल वॉटर फाउंटन व सार्वजनिक स्वच्छता गृह बांधण्यात येणार आहे. याकरिता महसूल विभागाने तातडीने याचे इस्टिमेट व डिझाईन बनवून त्याचे प्रस्ताव सादर करावे. नगरपालिकेने तातडीने त्याला मान्यता देऊन प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी.
प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद आहे की, उड्डाणपुलाखाली जागेमध्ये कोणते अवैध उद्योग होऊ नये व जागेचा सुयोग्य वापर लोककल्याणासाठी व्हावा यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. या उपक्रमासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची लवकरच ना-हरकत घेतली जाणार आहे. सदरचा भाग नगरपालिकेच्या हद्दीत आले असल्याने त्याचे प्रस्ताव नगरपालिका व बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून सादर करून आर्किटेक्ट असोसिएशनकडून त्याचे प्रकल्प अहवाल तयार करून घेतले जातील. हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच महामार्गावरील फुलांची स्वच्छता, लिंक रोड गटारांची स्वच्छता, साफसफाई आणि तेथील पथदिवे तातडीने सुरू करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. हे प्रस्ताव मंजूर करून घेऊन त्यासाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कळवले आहे.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |