09:24pm | Mar 24, 2022 |
कराड : जखिणवाडी, ता. कराड येथे एकावर कोयत्याने वार झाला आहे. बुधवारी 23 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गावच्या यात्रेदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून रात्री उशिरा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
संजय शंकर पाटील असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर अविनाश शेडगे, देवेंद्र येडगे व पृथ्वीराज येडगे सर्व रा. जखिणवाडी ता. कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी देवेंद्र अशोक शेडगे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळलेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी जखिणवाडी येथील कमानीजवळ संजय पाटील उभा होता. यावेळी समोरून आलेल्या अविनाश शेडगे, देवेन्द्र येडगे व पृथ्वीराज येडगे या तिघांनी पहाटे व सायंकाळी पुतण्या रुपेश पाटील यांच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरून मनात राग धरून दमदाटी करत त्याला मारहाण केली. यावेळी अविनाश येडगे याने शिवीगाळ करत तुमच्या घरातील एकाला खपणार आहे. आता तू बाहेर आला आहेस, तर तुला जिवंत ठेवत नाही. खल्लास करून टाकतो, असे म्हणून कोयत्याने हल्ला केला.
संजय पाटील याने त्याचा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी देवेंद्र येडगे यांनीही हातातील कोयत्याने संजय पाटील याच्यावर वार केले. तर अविनाश येडगे यांनेही पाटील यांच्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचे संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून संशयीत तिघांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गावच्या यात्रेवेळी जखिणवाडी येथे कोयत्याने वार झाल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत संशयित हल्ला करून घटनास्थळावरून पसार झाले होते. रात्री उशिरा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने देवेंद्र येडगे याला अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी करत आहेत.
दरम्यान, बुधवारी झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण होते. गुरुवारी पुन्हा काही जण हातात शस्त्र घेऊन गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |