02:22pm | Mar 14, 2022 |
कराड : मलकापूर नगरपालिकेने शहरातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प जाहिर केला आहे. काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे मलकापूर येथील उपकेंद्र व सातारा जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने ही तपासणी हाती घेण्यात आल्याचे मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी जाहिर केले.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी औषध निरिक्षक ॲड. विवेक चौधरी, आहार तज्ञ मौसमी देशमुख, नगराध्यक्षा निलम येडगे, महिला व बालकल्याण सभापती गितांजली पाटील, नियोजन विकास व शिक्षण समिती सभापती पुजा चव्हाण, नगरसेविका आनंदी शिंदे, कमल कुराडे, नंदा भोसले, अलका जगदाळे, स्वाती तुपे, शकुंतला शिंगण, माधुरी पवार, पालिकेच्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.
मलकापूर नगरपालिकेने शहरातील महिला व मुलींसाठी विविध नाविण्यपुर्ण योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, राजमाता जिजाऊ माता बालक दत्तक योजना आदींचा समावेश आहे. 8 मार्च रोजी जि.प. आरोग्य उपकेंद्र, मलकापूर व सातारा जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने महिलांची आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आले. यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाणे, शरीरातील रक्ताचे प्रमाण, कॅन्सर तपासणी, रक्तदाब व गरोदर माता तपासणी करण्यात आली असून महिलांना मोफत औषध उपचार व पोषण आहार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. मौसमी देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याविषयी उद्भवणारे प्रश्न व आहार शैली याबाबत सोप्या भाषेत महिलांना मार्गदर्शन केले. यामध्ये महिलांनी आपल्या आहारामध्ये करावयाचा बदल व पध्दती याबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या महिलांचा एकमेव शत्रु मोबाईल आहे. दिवसातून मिळणार वेळ हा मोबाईलमध्ये खर्ची पडत असलेमुळे दैनंदिन व्यायाम कमी होत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. अशावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाजारामध्ये मिळणाऱ्या औषधांची माहिती घेऊन त्याचे सेवन करत असल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होत असलेचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांनी आरोग्याविषयी असणाऱ्या तक्रारीबाबत डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार औषध व आहार घेतला पाहिजे.
दरम्यान, मलकापूरच्या विकासामध्ये महिला वर्गाचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. पालिकेने हाती घेतलेल्या महिला आरोग्य तपासणी अभियानामध्ये मलकापूर शहरातील महिलांनी आरोग्य तपासणी करुन वेळीच औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन नगराध्यक्षा निलम येडगे व महिला व बालकल्याण समिती सभापती गितांजली शहाजी पाटील यांनी केले आहे.
यावेळी काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कोमल पाटील, वैद्यकीय अधिकारी, तसेच काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र, मलकापूर डॉ. जयश्री देसाई, सुलोचना पावणे, आरोग्य सेविका, राजू पटेल यांनी मलकापूर शहरातील २६३ महिलांची आरोग्य तपासणी करून सहकार्य केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |