03:02pm | Dec 06, 2020 |
पुसेगाव: कृषि उत्पादनक्षेत्रात रब्बी हंगामातील हरभरासारख्या पिकास उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ते आत्मसात केल्यास हरभर्याचे उत्पन्न 30-40% वाढेल असा विश्वास निढळ (ता.खटाव) येथील हरितक्रांती फार्मस् प्रोड्युसर कंपनी निढळ यांनी फुले विक्रम या हरभरा जातीचे ग्रामबीजोत्पादन अंतर्गत नवनाथ खुस्पे यांचे क्षेत्रावरती बिजप्रक्रीया प्रत्याक्षिकाबद्दल मार्गदर्शन करताना कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी प्रतिपादन केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्यावतीने रब्बी हंगामामध्ये ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम उपविभागीय कृषि अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर, मंडल कृषि अधिकारी सचिन लोंढे यांचे मार्गदर्शानानुसार सुरु आहे.
याप्रसंगी बोलताना मुकूंद म्हेत्रे म्हणाले की, शुद्ध व चांगल्या प्रतीचे बियाणे स्थानिक पातळी वर उपलब्ध होणेसाठी शेतकर्यांनी प्रत्येक हंगामामध्ये ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविणे गरजेचे असून, शेतकर्यांनी स्वत: बियाणे निर्माण केल्यास उत्पादन खर्च कमी होवून आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. निढळ येथील फार्मर प्रोडूसर कंपनीने, बारामती येथून फुले विक्रम या जातीचे पायाभूत बियाणे उपलब्ध करुन घेवुन ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविला असून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी बिजप्रक्रिया पेरणी तंत्रज्ञान, रासायनिक खताच्या मात्रा व एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन मुकुंद म्हेत्रे यांनी केले, यावेळी बिजप्रक्रीया प्रात्यक्षिक व त्यांचे महत्व सांगितले. कृषि सहाय्यक निलेश किरतकुडवे यांनी एकात्मिकक किड नियंत्रणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हरितक्रांती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या उपक्रमाविषयी नवनाथ खुस्पे, अजित वसव, श्रीकांत खुस्पे यांनी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कृषि सहाय्यक निलेश किरतकुडवे, सुनिल शिंदे, शंकर दळवी, श्रीकांत खुस्पे यांनी परिश्रम घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |