04:25pm | Apr 30, 2024 |
सातारा : लोकसभेच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली असून ऐन निवडणुकीच्या काळात ठोसेघर, ता. सातारा सह परिसरातील गावांमध्ये बीएसएनएलच्या मोबाइल ला रेंज मिळत नसल्यामुळे नागरिकांनी बीएसएनएलच्या नावाने शिमगा सुरू केला असून ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते चांगलेच हवालदिल झाले आहेत. सातत्याने रेंज जात असल्यामुळे बीएसएनएलने त्यावर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, अशा इशारा ठोसेघर येथील नागरिकांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील बोर्णे घाट ते तालुक्यातील शेवटचे टोक चिखली दरम्यान ३० ते ३५ वड्या वस्ती, गावे आहेत. या ठिकाणी फक्त बीएसएनएलच्या सिम कार्डला रेंज मिळते. त्यामुळे घरोघरी बीएसएनएलचे सिम कार्ड वापरले जाते. विद्यार्थीही बीएसएनएल सिम कार्ड वापरतात. ठोसेघर हे पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. वर्षभर त्या ठिकाणी राज्यभरातून पर्यटकांची ये-जा सुरू असते. त्यांना ठोसेघर येथे केवळ बीएसएनला रेंज आहे, हे माहीत नसल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाशी, नातेवाइकांशी ठोसेघर येथून संपर्क साधता येत नाही. विशेष म्हणजे चार चाकी वाहन बंद पडल्यास पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणावर गोची होत असून रेंज अभावी कोणाशीही संपर्क साधता येत नसल्यामुळे अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते. चाळकेवाडी येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्क्यांवर स्थानिक युवक मोठ्या प्रमाणावर काम करतात. त्यांनाही रेंज न मिळाल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. सध्या लग्नाचा सिझन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अलीकडच्या काळात लग्न पत्रिका छापून पैसे खर्च करण्यापेक्षा मोबाइलवरून निरोप किंवा मेसेज पाठवून लग्नाचे निमंत्रण दिले जाते. मात्र रेंज मिळत नसल्यामुळे अनेकांना लग्नाचे निरोप देण्यासाठी पै पाहुण्यांच्याकडे पायपीट करून जावे लागत आहे. बीएसएनएल कंपनीच्या मनमानी कारभाराला ठोसेघरसह परिसरातील नागरिक कंटाळे असून बीएसएनएलच्या नावाने पठार भागात अक्षरशः शिमगा सुरू आहे. पठार भागात बिबट्या, अस्वल, गवे या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून या वन्य प्राण्यांनी पाळीव प्राणी अथवा नागरिकांवर हल्ला केल्यास त्याची तात्काळ शासन दरबारी माहिती द्यायची झाल्यास अथवा वैद्यकीय मदत मागायची असल्यास ती रेंज अभावी देता येत नाही.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लग्न समारंभ आणि निवडणुकीसाठी मुंबईवरून मोठ्या प्रमाणात स्थानिक पठार भागात आपल्या गावी आले आहेत. रोजच्या राजकीय घडामोडींची माहिती रेंज अभावी घेता येत नाही. कार्यकर्त्यांना अक्षरशः वाडी वस्तीवर तसेच गावागावात जाऊन प्रचार करण्याची वेळ आली असून कार्यकर्त्यांनीही बीएसएनएलच्या नावाने शिमगा सुरू केला आहे. सातत्याने रेंज जात असताना सुद्धा बीएसएनएल त्यावर कोणताही तोडगा काढत नसल्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ठोसेघर येथील नागरिकांनी दिला आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |