पुसेगाव: महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील हॉस्पिटलची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गणेश भोसले यांनी तहसिलदार खटाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि.27 मे 2021 रोजी सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जनकल्याण आरोग्य योजने बाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. रुग्णालयाने योजनेची संपूर्ण माहिती दर्शनी भागात बॅनर फलक बसवणे गरजेचे आहे. या योजनेचे अधिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र यांची नेमणूक करणे व रुग्णांना मार्गदर्शक म्हणून केली आहे. तरीसुद्धा तालुक्यातील अंगीकृत रुग्णालय त्याच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करत आहेत. तसेच यामध्ये कोरणा आजाराचा देखील समावेश आहे. तरीसुद्धा रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे घेतले जात आहे. गोर गरीब लोकांची होणारी आर्थिक लुट थांबवावी. अशा हॉस्पिटलची चौकशी करून कारवाई करावी व रुग्णांची पैसे परत करावेत. काही हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.
रूग्णांना जेवणामध्ये अनियमितता आहे. तालुक्यातील सर्व समाजातील लोकांना या योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये भ्रष्टाचार करणारे डॉक्टर, तालुका समन्वयक, आरोग्यमित्र, रुग्णालय यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन रिपाई (आठवले) जिल्हाध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वतीने करण्यात येईल. हे निवेदन देताना रिपाईचे खटाव तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले, जिल्हा नेते अजित नलावडे, महादेव बनसोडे, महेंद्र माने, विश्वासराव जगताप, बी.आर.जगताप, माजी सरपंच शिवाजी तडके, प्रशांत गुजर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |