10:24pm | May 19, 2023 |
सातारा : भूसंपादन शाखा प्रांत ऑफिस कराड येथील कंत्राटी तत्वावर ची दोन लिपिकांना वीस हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली यामुळे महसूल विभागांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे रामचंद्र श्रीरंग पाटील वय 70 लिपिक भूसंपादन शाखा प्रांत ऑफिस कराड ,दिनकर रामचंद्र ठोंबरे वय 70 लिपिक भूसंपादन शाखा प्रांत ऑफिस कराड हे दोन्ही लिपिक कंत्राटी तत्वावर येथे काम करतात. तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असून येरवळे, ता. कराड येथील नऊ शेतकरी यांच्याकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा करणे करता प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. त्यानुसार तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालयात येथे मूल्यांकन प्रक्रिये बाबत पाठपुरावा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंत्राटी लिपिकांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक शाखा सातारा च्या उपाधीक्षक उज्वल वैद्य यांच्याकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर सावंत, निलेश राजपुरे विक्रम सिंह कणसे यांनी दिनांक 16 व 17 मे रोजी पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी प्रांत ऑफिस कार्यालयात सापळा रचला आणि पाटील व ठोंबरे या दोघांनाही प्रत्येकी 10 असे मिळून 20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी या कारवाईबद्दल पथकाचे अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |