सातारा : सातारा जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी आज शांततेत मतदान झाले. ९०९३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद असून किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मतमोजणी दि.१८ जानेवारी रोजी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली होते. त्यापैकी २२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामध्ये सातारा तालुक्यातील ३९, जावली ३७, कोरेगाव ७, वाई १९, महाबळेश्वर २८, खंडाळा ७, फलटण ६, माण १४, खटाव १४, कराड १७, पाटण ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मात्र ६५२ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली. या निवडणुकीत ९०९३ उमेदवार आमने सामने उभे होते. गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला होता.
ग्रामपंचायतीसाठी आज सातारा तालुक्यात १३० ग्रामपंचायतींसाठी २७९, जावली तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींसाठी ७६, कोरेगाव तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींसाठी १५१, वाई तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींसाठी १५१, महाबळेश्वर तालुक्यात ४२ ग्रामपंचायतींसाठी ३०, खंडाळा तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींसाठी १३८, फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायतींसाठी २६१, माण तालुक्यात ६१ ग्रामपंचायतीसाठी १४७, खटाव तालुक्यात ९० ग्रामपंचायतींसाठी २६५, कराड तालुक्यात १०४ ग्रामपंचायतींसाठी ३४६, पाटण तालुक्यात १०७ ग्रामपंचायतीसाठी १९६ मतदान केंद्रांवर आज किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले.
संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी १५ हजार ६७३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. बहुतांश ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान ५० टक्के पेक्षा अधिक मतदान झाल्याचे चित्र दिसून येत होते. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्ती गर्भवती महिला यांच्यासाठी व्हील चेअर ठेवण्यात आल्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुमारे ८५ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |