05:08pm | Jan 27, 2022 |
सातारा : पोलीस दल हे शिस्तीचे खाते. या खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा मान, सन्मान असतो. एखाद्या पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक हा त्या ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागाचा सर्वेसर्वा असतो. मात्र, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी रुजू झाल्यापासून स्मार्ट पोलिसिंग करत सर्व कर्मचाऱ्यांना एक वेगळी शिस्त व संदेशही दिला आहे. सर्व कर्मचारी पोलीस निरीक्षक पतंगे यांना देवमाणूस मानत आहेत. प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन करण्याचा मान खरंतर वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांनाच होता. मात्र, त्यांनी लवकरच निवृत्त होणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शब्बीरखान मोकाशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन त्यांचा केलेला सन्मान सर्वांनाच सुखावून गेला.
प्रजासत्ताकदिनी शाहूपुरी पोलीस ठाण्यास सकाळी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी अपडेट गणवेशात ध्वजाला सलामी देण्यासाठी जमले होते. सर्व तयारीही झाली होती. ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगेही हजर झाले. ते आल्यानंतर त्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाची तयारी जाणून घेतली. काही वेळानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रमही सुरु झाला. तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. सर्व वातावरण भारावून गेले होते.
तेवढ्यात ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना विनंती करण्यात आली. तेव्हा मात्र पतंगे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शब्बीरखान मोकाशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होर्इल, असे जाहीर केले. तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांसह उपस्थितांना अनोखा धक्का बसला. तेव्हा त्यांनी मोकाशी एप्रिल महिन्यात पोलीस दलातून सेवानिवृत्त होत असून त्यांनी त्यांच्या सेवाकालात केलेल्या कामाचा सन्मान, गौरव म्हणून मोकाशी यांच्या ध्वजारोहण होर्इल, असे सांगत त्यांना हा मान दिला.
ध्वजाला सलामी दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मोकाशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तिरंगा आकाशात लहरु लागला आणि एका कर्मचाऱ्याच्या हस्ते हा सोहळा झाल्याने उपस्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची छातीही अभिमानाने फुलून गेली. कारण आपल्या वरिष्ठांकडून अशा प्रकारे होणारा सन्मान सर्वांनाच सुखावणारा होता. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सर्व कर्मचाऱ्यांकडून संजय पतंगे यांच्या कृतीचे कौतुक करण्यात येत होते. पोलीस दलातील ताणतणा व हाताळताना कायद्याच्या चाकोरीत राहून न्याय देण्याची भूमिका बजावण्याचे काम संजय पतंगे करत असतात. तसेच कार्यालयीन कामकाजासह आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांचे वर्तन हे नेहमीच एका चांगल्या गुरुचे, अधिकाऱ्याचे राहिले असल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना संजय पतंगे यांच्या कृतीतून एक देवमाणूस दिसल्याच्या भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |