11:21pm | May 24, 2023 |
सातारा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे प्रा. दशरथ बलटू सगरे यांच्या जागेत डेव्हलमेंट सुरु आहे. तेथे जेसीबीने सपाटीकरण व झाडे तोडण्याचे काम दि. 22 रोजी सुरु होते. त्याच वेळ कामास अटकाव करत पाच कोटी रुपये आणि पाच एकर जमीन नावावर करुन देत नाही तोपर्यंन येथे प्रा. सगरे यांना डेव्हलमेंट करुन देणार नाही, अशा स्वरुपात खंडणीची मागणी करत ऑफिसची मोडतोड केल्याप्रकरणी सात जणांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुदाम जयराम कांबळे, संजय पांडूरंग कांबळे, विजय निवृत्ती कांबळे, अजिंक्य अलबत कांबळे, अनिता संजय कांबळे, अलका अलबत कांबळे, निर्मला विजय कांबळे (सर्व रा. बौद्ध वस्ती शिरवळ) अशी त्या सात जणांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या समोरील प्रा. दशरथ सगरे यांच्या मालकीच्या जागेत दि. 22 राज दुपारी 12 ते सव्वा बाराच्या दरम्यान महादेव शंकर कांबळे (वय 51, रा. भवानीनगर शिरवळ) हे जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम करत होते. तेव्हा तेथे सुदाम कांबळे, संजय कांबळे, विजय कांबळे, अजिंक्य कांबळे, अनिता कांबळे, अलका कांबळे, निर्मला कांबळे हे तेथे आले. त्यांनी काम बंद करण्यास सांगत आम्हाला जोपर्यंत पाच कोटी रुपये व पाच एकर जमीन नावावर करुन देत नाही तोपर्यंत प्रा. दशरथ सगरे यांना येथे डेव्हलमेंट करु देत नाही, अशी धमकी देत खंडणी मागीतली. त्यावरुन महादेव कांबळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सुदाम कांबळे, संजय कांबळे, विजय कांबळे, अजिंक्य कांबळे या चौघांनी बेदम मारहाण केली. तसेच त्या सात जणांनी महादवे कांबळे यांच्या मालकीचे 7 गुंठे जागेतील पत्र्याचे ऑफीसची मोडतोड केली. त्यातील साहित्य फेकून दिले. रोवलेले सिमेंटचे पोल, कंपाऊंड आणि नळ कनेक्शन तोडून टाकले. यावरुन सात जणांवर खंडणीचा व मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा दाखल केलेला असून याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक देसाई या करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |