01:58pm | Jul 09, 2020 |
सातारा : सातारा शहरानजिक मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक सोयी-सुविधांना भुलून शाहूपुरी येथे जागा व फ्लॅट खरेदी करीत आहेत. परंतू याठिकाणी नागरी सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने आता हेच लोक मोळाचा ओढा ते शाहूपुरीकडे जाणार्या शिंदे फर्निचर लगत असणार्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीच्या अनास्थेमुळे पंतप्रधान सहाय्यता निधीची मागणी करु लागले आहेत. विशेष म्हणजे सातारा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला कल्पना देवूनही त्यांच्या वेळकाढूपणाच्या एमबी मुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शाहूपुरी परिसरात पन्नास गृहनिर्माण संस्था व साडेतीन हजार निवासस्थाने, बंगले व भाडेकरुंसाठी बांधलेली घरे आहेत. या नागरिकांना ये-जा करण्यासाठी शाहूपुरी ते मोळाचा ओढा हा कच्चा रस्ता उपयुक्त ठरत असतो. या रस्त्याला नाला, गटर नसल्याने शेजारील नागरी वस्त्यांचे सांडपाणी या रस्त्यावरुनच वाहत असते. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणार्यांचा व स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी-चारचाकी वाहनांचे या खड्ड्यांचा थांग न लागल्याने अपघातही घडले आहेत. मात्र, दर पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडून या सांडपाण्यात अधिकच भर पडते. या रस्त्यावरुन जाताना नागरिकांना तोंडाला रुमाल/मास्क हा वापरावाच लागतो. दुचाकी, चारचाकी वाहनांचे या खड्ड्यांमुळे नुकसान होते.
केंद्रामध्ये भाजपचे सरकार असून शाहूपुरी ग्रामपंचायतीचे सत्ताधारी व विरोधक हे भाजपचे खासदार-आमदार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या छोट्याशा रस्त्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून रस्त्याचे काम तात्पुरत्या स्वरुपात का होईना, सुरु करतील, अशी भाबडी आशा वाहनचालकांना आहे.
निवडणुकीच्या काळात बिदागी घेवून प्रचार करणारांपेक्षा खासदार-आमदारांचे कट्टर समर्थक पदयात्रा काढून लोकांना नागरी सुविधांबाबत भूलथापा देतात. निवडणूक झाल्यानंतर गटा-तटाचे राजकारण करतात. विकासकामांबाबत गप्पा मारल्या जातात. त्यांच्यासाठी मोळाचा ओढा ते शाहूपुरी हा रस्ता आरसा ठरु लागला आहे. या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे, असे एका मातेला मूल कडेवर असताना सांगितले होते. आज तो मुलगा दुचाकी घेवून याच रस्त्यावरुन महाविद्यालयात जाताना तोच रस्ता पाहून ग्रामपंचायतीच्या कारभाराला दुवा देत आहे. या रस्त्याचा वापर जावली, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, पुणे, मुंबई तसेच सातारा बसस्थानकाकडे जाण्यासाठी येथील नागरिकांना होत असतो. या रस्त्याची अवस्था पाहून अनेकांना उमेदवार पसंत नाहीत, असे मत व्यक्त केलेलेच आहे. आता यापुढे पंतप्रधान सहाय्यता निधीशिवाय पर्याय नाही, म्हणून ही मागणी होत असल्याची चर्चा या परिसरात आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |