फलटण : निंबकर ऍग्रीकल्चरल रिसर्च डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे संस्थापक, प्रख्यात निंबकर बियाण्यांचे उत्पादक पद्मश्री बनविहारी विष्णू तथा बी. व्ही. निंबकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी आज (दि. २५) दुपारी १२.१५ वाजता निधन झाले. दुपारी ४ वाजता फलटण-लोणंद रोडवरील निवासस्थानाच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निंबकर कापूस बियाण्याच्या माध्यमातून त्यांनी फलटण, बारामती, अकलूज, पंढरपूर या प्रमुख कापूस उत्पादक तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राला सुधारित कापूस बियाणे उपलब्ध करुन दिले. त्याचबरोबर अधिक लोकर व मांस उत्पादन देणाऱ्या मेंढरांच्या प्रजाती संशोधित करुन मेंढपाळांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्या कामात त्यांनी मोठे यश प्राप्त केले आहे.
स्व. विष्णू निंबकर आणि स्व. कमला निंबकर (पूर्वाश्रमीच्या ईलीझाबेथ लुंडी) यांच्या पोटी कृषितज्ञ बी. व्ही. निंबकर यांचा जन्म दि. १७ जुलै १९३१ रोजी झाला. न्यू टाऊन, पेन सिल्वानिया येथील क्वेकर संचलित जॉर्ज स्कूल येथे त्यांचे प्रा. शिक्षण झाले. (याच ठिकाणी त्यांच्या आईचे शिक्षण झाले होते) अरिझोना विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतात परतले. दरम्यान, दिनकरराव कर्वे व इरावती कर्वे यांच्या सुकन्या जाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
भारतात परतल्यानंतर सन १९५६ मध्ये त्यांनी महाराष्ट्रात फलटण या सातारा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी परंपरागत शेती करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर रॉकफेलर फौंडेशन यांच्या आर्थिक सहाय्यातून निंबकर सिड्स या नावाने बियाणे उत्पादन व प्रक्रिया व्यवसाय सुरु केला.
शेती विषयक संशोधन व विकासासाठी संस्थेची स्थापना
सन १९६८ मध्ये निंबकर अग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या नावाने ना नफा, ना शासकीय अनुदान या तत्वावर शेतीमध्ये प्रगत संशोधन करणारी संस्था स्थापन केली. त्यांनतर या संस्थेने अक्षय ऊर्जा, पशू पालन व शाश्वत विकास या उपक्रमांचा सहभाग वाढवला, त्यांच्या नारी या संस्थेला शुद्ध बोअर जातीच्या शेळ्या भारतामध्ये प्रथम पैदास करण्याचे श्रेय दिले जाते.
या संस्थेने विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विशेषतः सन २००९ चे शाश्वत विकास पारितोषिक या संस्थेच्या कंदील व स्टोव्ह ला मिळाले, नारी सुवर्णा नावाने दख्खनी मेंढी पैदास, औद्योगिक ज्वलनासाठी लुस बायोमास गॅसिफायरचा विकास, बोकडाच्या गोठवलेल्या वीर्याचा वापर करुन कृत्रीम रेतन पद्धतीचा विकास, उच्च उत्पन्न देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन बोअर मेंढीचे प्रजनन आणि संकरित गोड ज्वारीच्या वाणाचा विकास आदी विविध क्षेत्रात त्यांच्या या संस्थेने संशोधन केले आहे.
या उपक्रमांमुळे संस्थेला विविध पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने शास्त्रीय व औद्योगिक संशोधन परिषद (सी एस आय आर) यांचे सन २००७ मधील शास्त्रीय व तंत्रज्ञान नवोपक्रम ग्रामीण विकास सन्मान याचा प्रामुख्याने समावेश होतो. देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक नियत कालिकांमध्ये लेख लिहुन स्व. बी. व्ही. निंबकर यांनी आपले संशोधन दस्तऐवज स्वरुपात लोकांना उपलब्ध करुन दिले.
भारत सरकारने त्यांना सन २००६ मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले, तर जमनालाल बजाज पुरस्कारही सन २००९ मध्ये बहाल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |