03:59pm | Apr 27, 2024 |
सातारा : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल या नामवंत शाळेचा सध्या शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष सुरू आहे. या महोत्सवाच्या या उद्घाटन सोहळ्यातील कार्यक्रमात प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोदराव रावत, उपाध्यक्ष अशोकराव पलांडे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांचे सह डॉ. . रविंद्र आचार्य - अध्यक्ष मार्गदर्शक मंडळ, सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, अनंतराव जोशी सारंग कोल्हापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रेक्षागृहापुढील भव्य मैदानावर शाळेच्या आजी-माजी विद्यार्थी पदाधिकारी तसेच पालकांनी सादर केलेल्या सुरेला आवाजातील श्रीराम गीतानी सातारकर मंत्रमुग्ध झाले.
मान्यवरांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन केल्यावर दीप प्रज्वलन आणि संस्थेच्या संस्थापक यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बहारदार असा सुमारे अडीच तासांचा हा श्रीराम गीतांचा संगीत कार्यक्रम ऐकताना उपस्थित सातारकर श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या गायन सेवेचा प्रारंभ ..तुम आशा विश्वास.. या पल्लवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रारंभी गीताने झाल्यावर ग. दि .माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्याकडून संपूर्ण जगात अजरामर झालेल्या अशा गीतरामायणातील गीतांनी ही संध्याकाळ अक्षरशः मोहरून गेली. उपस्थित सातारकरांनीही या गायन सेवेचा आनंद घेताना मुखाने ही पदे गुणगुणत तल्लीन झाल्याचा आनंद लुटला.
त्यानंतर ..विजय पताका श्रीरामाची.. कौशल्येचा राम माझा ..आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. श्रीरामा रामसावळ सुंदर.. ठुमक चलत रामचंद्र.. हिंदी भजन त्यानंतर.. रामा रघुनंदना.. राम भजन कर मन ,..तोडिता फुले.. यानंतर पुन्हा एकदा हिंदीतील ..राम का गुणगान.. सादर होऊन या कार्यक्रमाच्या मध्यंतराला संस्थेच्या उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार अमित कुलकर्णी, शाळा प्रमुख एकनाथ बुरसे यांचे सह मान्यवरांनी शाल श्रीफळ तसेच दासबोध आणि चैत्र गुढी हे सन्मानचिन्ह देऊन केला.
यावेळी संस्थेवर निवड झालेले वाई येथील नितीन पोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना प्रमोद रावत म्हणाले की, संस्थेच्या वतीने या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नेहमीप्रमाणेच सातारा येथील सर्व नागरिकांनी या संस्थेच्या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे. सांकेतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आफळे व सीमा जोशी यांनी केले, तर सत्कार सोहळ्याचे निवेदन जान्हवी देशपांडे यांनी केले होते.
मध्यंतरानंतर गीत रामायण मालिकेतील.. गीत मालिका.. सादर होताना.. पतीत पावना जानकी जीवना श्री रामचंद्र कृपालु भज मन.. राम प्रहरी .. रम्य ही स्वर्गाहुनी लंका.. गा बाळांनो श्री रामायण आणि श्रीराम जय राम ..या जयघोषाने या अतिशय सुरेख अशा संगीतमय कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमात गायक माधुरी कुलकर्णी, हेमांगी जाधव, पल्लवी, निकित सरवटे, स्वरदा राजोपाध्ये, अनघा जोशी, पल्लवी रानडे, शर्वरी, मिथाली, राजेंद्र आफळे, दत्तात्रय डोईफोडे, रमणी कुलकर्णी, पूर्वा जठार, अमित द्रविड, जयंत सरवटे, कु.जठार, कु.लोहार आदींनी गायन साथ केली. किंबोर्ड साथ सचिन शेवडे यांची होती तबला साथ सचिन राजोपाध्ये, ऑक्टोपॅड वर सुजित गायकवाड संवादिनी वर स्वरा किरपेकर तालवद्यांसाठी साथ श्रेयस बर्गे, सुमेध कुलकर्णी साथ केली व ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांची होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशाला प्रमुख सुजाता पाटील यांनी केले.
डॉ.सुभाष दर्भे - मानद अध्यक्ष,डॉ. रविंद्र आचार्य - अध्यक्ष मार्गदर्शक मंडळ, वसंत फडतरे - कार्याध्यक्ष,निळकंठ पालेकर -स्वागत अध्यक्ष,माधव सारडा -सचिव, एकनाथ बुरसे - शालाप्रमुख, सारंग कोल्हापुरे - सचिव, अनंत जोशी - स्वागत अध्यक्षप्रकल्प समिती, विजय पंडीत, रविंद्र परांजपे, डॉ. हर्षवर्धन कुलकर्णी, दिलीप भाटिया, कल्याण राक्षे, माधव प्रभूणे, दिपक खांडके, सुजित शेडगे. सौ.दिक्षित, अशुतोष दाबके, नगरसेवक भाऊ जांभळे, यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर शाळेचे माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |