11:40pm | Jul 30, 2023 |
सातारा : कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पडलेले रेडकू वाचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या २० वर्षीय युवक प्रशांत लक्ष्मण दळवी हा वाहून गेला होता. त्याच्या शोधार्थ शोध मोहीम सुरू असताना रेडकू तलावात जखमी अवस्थेत मिळाले. मात्र, युवक मिळून आला नाही. त्यावेळी रात्र झाल्याने ग्रामस्थांनी शोध मोहीम थांबवली. ती शनिवारी सकाळी पुन्हा सुरू केली. सायंकाळी युवकाचा मृतदेह तलावाच्या कडेला आढळून आला.
दरम्यान, आर्वी येथील नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनेची माहिती दिली होती. मात्र, दिवसभर महसूल विभागातल्या तलाठी, मंडलाधिकारी यांनी रेस्क्यू पथक न पाठवता केवळ विचारपूस करण्यापलीकडे काहीच मदत केली नाही.
आर्वी येथील प्रशांत लक्ष्मण दळवी हा शुक्रवारी गुरे चरण्यासाठी बाळोबाच्या खिंडीकडे गेला होता. दुपारी एकच्या सुमारास उरमोडी कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात रेडकू पडले. कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात रेडकू वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी तो कॅनॉलच्या कडेने पळत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. उतारावरून वाहणाऱ्या पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे "कॅनॉलमध्ये उतरू नकोस," असंही त्याला सांगितले.
याबाबतची माहिती त्याचे वडील लक्ष्मण जगन्नाथ दळवी यांना समजली. तात्काळ दळवी परिवार गावातील ग्रामस्थ आणि युवकांनी कॅनॉलवर शोध सुरू केला. काही अंतरावर कॅनॉलच्या कडेला त्याच्या दैनंदिन वापरातील चप्पल, टॉवेल, छत्री, डबा, पिशवी असे साहित्य मिळून आले. सर्वजण शोध घेत पुढे गेले असता आर्वी-कोंबडवाडी हद्दीत असलेल्या तलावानजीक पाण्यात वाहून आलेले रेडकू जखमी झालेल्या अवस्थेत मिळून आले. मात्र, प्रशांत दळवी मिळून आला नाही. दुपारी सुरू झालेली शोधून मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कालव्याच्या पाण्याला गती असल्याने नंतर शोधमोहिम थांबवण्यात आली .सकाळी प्रशांत चा मृतदेह तलावाच्या कडेला आढळून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |