04:12pm | Apr 19, 2024 |
चंदामारी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मात्र मतदानाला सुरुवात होताच बंगालमध्ये हिंसाचाराला तोंड फुटलं आहे.
पश्चिम बंगालमधील कूचबिहार लोकसभा मतदारसंघात चंदामारी येथे मतदान केंद्रासमोर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. चंदामारी येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक करण्यात आली, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच या दगडफेकीमध्ये भाजपाचा एक पोलिंग एजंट हा जखमी झाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते निशित प्रामाणिक यांच्या घराजवळ बॉम्ब सापडला. हा बॉम्ब पोलिसांनी हटवला आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून, येथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर काँग्रेस आणि डावे पक्ष हे या दोघांनाही आव्हान देतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २३, भाजपाने १८ तर काँग्रेसने १ जागा जिंकली होती. त्यामुळे यावेळी बंगालची जनता काय कौल देणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |