11:36am | May 10, 2024 |
मुंबई : महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहे तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे.
महावितरणच्या वीजसेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहकसेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅट बॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केले आहे. राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‘ऊर्जा’ चॅट बॉट www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई- मेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्यूलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅट बॉट थेट मदत करीत आहे.
वीजसेवेबाबत माहिती हवी असल्यास ‘ऊर्जा’च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना या चॅट बॉटमधूनच मिळणार आहे. यासोबतच वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीजग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे २४x७ सुरू असलेले टोल फ्री क्रमांक,‘एसएमएस’ क्रमांक, ई-मेल, मिस्ड कॉल सेवा आदींची माहिती चॅट बॉटद्वारे उपलब्ध आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून कार्यान्वित झालेल्या ‘ऊर्जा’चॅट बॉटचा वीजग्राहक मोठ्या संख्येने वापर करीत असून त्यांना वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाण्याची आता आवश्यकता उरलेली नाही. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमीट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅट बॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येईल. तसेच इतर ग्राहकांना विविध सेवेचा लाभ घेता येत आहे.
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |