07:56pm | Apr 17, 2024 |
सातारा : पक्ष जो उमेदवार देईल त्यांचे काम प्रामाणिकपणे करत त्याला निवडून देणार, असे सांगणार्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा व जावली येथील पदाधिकार्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना गुरुवारी होणार्या शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा व जावली मतदारसंघ आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या एकहाती वर्चस्वामुळे भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. या मतदार संघात उदयनराजे प्रत्यक्ष किती मताधिक्क्य घेणार, हा खरा उत्सुकतेचा प्रश्न आहे.
पक्षश्रेष्ठींना शब्द दिल्याप्रमाणे उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी शिवेंद्रसिंहराजे यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवशी सुरूचीवर जाऊन केलेले बेरजेचे राजकारण व शिवेंद्रसिंहराजे यांची निवडणूक सज्जता यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सातारा विधानसभा मतदार संघातून ऑल इज वेलचा संदेश गेला आहे.
गुरुवार दि. 18 रोजी महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातारा आणि जावली तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठीची नियोजन बैठक आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुची कार्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीला सातारा आणि जावली तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक गावातून, शहरातील वॉर्डातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले पाहिजेत, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. सर्वांनी सकाळी गांधी मैदान येथे उपस्थित राहावे. उमेदवारी अर्ज भरताना विराट शक्तिप्रदर्शन झाले पाहिजे, त्यामुळे उद्याच्या रॅलीत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग सातारा आणि जावली तालुक्यातून झाला पाहिजे. सातारा आणि जावली तालुक्यातील भाजपची ताकद काय आहे हे उद्या आपण दाखवून द्यायचं, यात कुठेही कोणीही कमी पडू नये, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांना केल्या.
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |