सातारा : किल्ले वर्धनगड (ता कोरेगाव) येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या दर्गा परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम आज पहाटे पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवकालीन असलेला दर्गा काही समाजकंटकांनी काही दिवसापूर्वी पाडला होता. परंतु बांधते वेळी या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे मनसेचे कार्यकर्त्यांनी वनविभागाला कळवून हे वाढीव अतिक्रमण काढावे अन्यथा हनुमान मंदिराला परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यास अनुसरून कागदपत्रानुसार त्या ठिकाणी असलेली कबर सोडून झालेले अतिक्रमण आज पोलीस प्रशासनाच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वनविभागाच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले.
हे अतिक्रमण काढतेवेळी कुठल्याही प्रसार माध्यमांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत दर्गा सोडून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.
कुठलाही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गडावर जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. वर्धनगड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. वर्धनगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. हा किल्ला सातारा- पंढरपूर रस्त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याचा सीमेलगत बांधलेला आहे. काही ऐतिहासिक संदर्भा नुसार या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महिना वास्तव्य होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |