08:01pm | Apr 17, 2024 |
सातारा : भारतीय जनता पार्टीच्या बाराव्या यादीमध्ये अखेर उदयनराजे भोसले यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली. उदयनराजे भोसले गुरुवार दिनांक 18 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे महायुतीचे सातारा शहरात उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे. या शक्ती प्रदर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिन्ही वरिष्ठ नेते सातार्यात येणार असल्याने या रॅलीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मीच उमेदवार, असे म्हणत पंधरा दिवसांपूर्वीच आपला प्रचार सुरू केला होता. भाजपच्या केंद्रीय सुकाणू समितीने अखेर बाराव्या यादीत उदयनराजे भोसले यांच्या नावावर अधिकृत मोहर उमटवली. गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजे समर्थकांनी याची जोरदार तयारी केली आहे. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकार्यांना पाचरण करून जबाबदार्या निश्चित करून दिल्या आहेत. याशिवाय कराड उत्तर, दक्षिण, पाटण, वाई येथील भाजपचे हजारो पदाधिकारी सातार्यात दाखल होणार आहेत. सजवलेल्या रथातून उदयनराजे यांची भव्य रॅली निघणार असून या रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता होणार आहे.
उदयनराजे यांचा अर्ज दाखल होणार असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जातीने स्वतः हजर राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या तोडीस तोड अशी रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते हे उद्या सातार्यात असल्याने सातार्याचा राजकीय पारा वाढलेला आहे.
सांगलीमध्ये संजयकाका पाटील हे सुद्धा शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करणार असल्याने सातार्यात उदयनराजे यांच्या समवेत उपस्थिती दर्शवून महायुतीचे नेते दुपारी सांगलीला प्रयाण करणार आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांचा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा एक दौरा पूर्ण झाला आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची होणारी राजकीय टोलेबाजी हा चर्चेचा विषय असणार आहे. सातार्यामध्ये महायुतीचे नेते काय बोलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
उदयनराजे भोसले मित्र समूह, सातारा विकास आघाडी तसेच सहा मतदारसंघातील लोकसभा संयोजक आणि पदाधिकारी या भव्य रॅलीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या सातार्यात महायुतीचे विराट शक्ती प्रदर्शन घडवून अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात उदयनराजे भोसले हे अर्ज दाखल करतील. गांधी मैदानावरून रॅलीची सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |