02:33pm | Apr 18, 2024 |
सातारा : सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक लि.,साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ प्रभाकर रायरीकर आणि राजेंद्र जगन्नाथ जाधव यांची नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये सर्वांनुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांनी बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेच्या धोरणांचे, निकष व सूचनांचे तंतोतंत पालन करत आहे. बँकींग क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमध्ये बँकेची भरभराट होवून, बँकेचा नावलौकीक वाढवण्यासाठी श्री. रायरीकर, श्री. जाधव यांचा या क्षेत्रातील अनुभवाचा, मार्गदर्शनाचा बँकेस निश्चित लाभ होईल असा विश्वास व्यक्त दोघांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सौरभ रायरीकर हे व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असून एल. एल. एम पदवीधारक आहेत. त्यांना बँकींग क्षेत्रातील ११ वर्षे त्याचप्रमाणे फायनान्स मॅनेजमेंट, ट्रेझरी मॅनेजमेंट, इन्कमटॅक्स कायदा, जी. एस. टी कायदा इत्यादी कामकाजाचा अनुभव आहे. तसेच श्री. राजेंद्र जाधव हे देखील व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असून एफसीए, डीआयएसए (आयसीएआय), बी.कॉम ही पदवी धारण केली असून त्यांना बँकींग क्षेत्रातील १८ वर्षे त्याचप्रमाणे टॅक्स ऑडीट, व्हीएटी ऑडिट, ट्रस्ट ऑडीट, को-ऑपरेटिव्ह ऑडीट, बँक ऑडिट, टॅक्सेशन, इन्कमटॅक्स, जी.एस.टी, अकौंटींग इन्फॉरमेशन, सिस्टीम ऑडीट इत्यादी कामकाजाचा अनुभव आहे. श्री.रायरीकर व श्री. जाधव यांनी जनता बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी स्वीकृत पध्दतीने निवड केल्याबद्दल संचालक मंडळातील सर्वांना धन्यवाद देवून बँकेच्या प्रगतीसाठी निश्चितच कार्यरत राहीन अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, व्हाईस चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालक आनंदराव कणसे, जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, चंद्रशेखर घोडके (सराफ), वसंत लेवे, अविनाश बाचल, सौ. सुजाता राजेमहाडीक, बाळासाहेब गोसावी, नारायण लोहार, रविंद्र माने, ॲड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, मच्छिंद्र जगदाळे, सेवक संचालक श्री. अन्वर सय्यद, अभिजित साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, अधिकारी, सेवक वर्ग उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |