01:53pm | Apr 27, 2024 |
सातारा : सातारा शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये चोऱ्यामाऱ्या करून; दहशत पसरवणाऱ्याला माझ्या विरोधातल्या उमेदवाराला महाविकास आघाडीने बळ दिले. आता गुंडगिरी पोसत मतांचा जोगवा मागणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.
कोडोली ता. सातारा येथे कोडोली वनवासवाडी जिल्हा परिषद गट व वर्ने गावातील आजी-माजी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना देशमुख, संदीप शिंदे, जिल्हा बँकेच्या संचालक कांचन साळुंखे ,पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण धस्के ,भास्करराव घोरपडे, विलासराव घोरपडे, निलेश कुलकर्णी,प्रवीण साळुंखे, माजी उपसभापती विजय काळे,संतोष कणसे, बाळासाहेब खरात,मधुकर पवार, सयाजी ताटे आदींची उपस्थिती होती.
उदयनराजे पुढे म्हणाले, नगरसेवक पदापासून माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना माझ्या पत्रामुळे झाली. जिल्ह्यात जी 11 धरणे झाली आहेत, ती याच महामंडळाच्या माध्यमातून झाली. दुष्काळी भागाला पाणी मिळाले. मी दोनदा खासदार झालो, त्यानंतर माझ्याकडे कुठलेही पद नव्हते. मात्र मी गप्प बसून राहिलो नाही. काम करत राहिलो. याचा परिणाम म्हणजे, मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रचंड उपस्थिती यातूनच भविष्याची नांदी पाहायला मिळते आहे, असे ही ते म्हणाले.
आमदार महेश शिंदे म्हणाले, उदयनराजेंनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच दिवशी लोकसभा निवडणुकीतील त्यांचा विजय निश्चित झाला होता. उदयनराजेंच्या सभांना प्रचंड अशी गर्दी होत आहे. याच गर्दीचे रूपांतर मतांमध्ये नाही करूया. उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करायचे आहे, त्यासाठी ज्या बूथला जास्त मते त्या बूथला भविष्यात जास्त कामे असे धोरण राबवले जाणार आहे.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी मतदानाचा अधिकार सुरू झाला आहे. त्या सैनिकांच्या घरी गाठीभेटी घेऊन भाजपला मतदान करण्याबाबत आवाहन करावे.
संदीप शिंदे म्हणाले उदयनराजेंमुळे साताऱ्याचे नाव देशभर आदराने घेतले जाते. त्यांच्या विरोधात न्यायालयाने दोषी ठरवलेला बाजार समितीतील एफएसआय घोटाळ्यातील संशयित निवडणुकीसाठी उभा आहे. वाशी मार्केटमध्ये आपल्या भागातूनच कृषीमाल विक्रीसाठी पाठवला जातो. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशातील 20 टक्के वाटा कोणाला जातो, त्याचा जाब आता विचारायची वेळ आलेली आहे. देशाचा स्वाभिमान असलेल्या उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवायचे आहे, असे ही ते म्हणाले.
याप्रसंगी राजू पाटील, कांचन साळुंखे, विलास घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |