07:08pm | Mar 22, 2022 |
वाई : 'काशीनाथाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱ्यातील बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.
मागील दोन वर्षापासून बगाड यात्रेवर काही बंधने होती. २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच बगाड यात्रा झालेली होती, तर मागील वर्षीच्या यात्रेला कोरोना प्रादुर्भावामुळे बंदी घातलेली असतानाही गावकऱ्यांनी परंपरा खंडीत होण्याच्या भीतीने गनिमीकाव्याने बगाड मिरवणूक काढून यात्रा साजरी केली होती. यावर्षी खुल्या वातावरणात बगाड यात्रा भरत असल्यामुळे गावकर्यांमध्ये मोठा उत्साह आहे. बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने यात्रेकरू जमा झाले. सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले.
होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन (ता वाई) येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाड्या निवडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. या वर्षीचा बगाडाचा मान बाळासाहेब मांढरे यांना मिळाला. मागील पाच दिवसापासून ते गावातील मंदिरात पूजा करून मंदिरातच मुक्कामाला होते. सोमवारी रात्री बावधन येथे शेकडो ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी शाही छबिना मिरवणूक निघाली होती. या छबिन्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेकरू सहभागी झाले होते. सकाळी बगाड्याला आणि बगाडाचा रथ कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वर येथे आणण्यात आला. तिथे ग्रामदेवतेची पूजा झाल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढविण्यात आले आणि धुष्टपुष्ट बैलांच्या मदतीने दगडी चाकांचा, अडीच तीन टन वजनाचा बगाडाचा रथ बघाड बैलांच्या मदतीने ओढून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवारनिहाय व भावकी निहाय ठिकठिकानी बारा ते सोळा बैल जुंपून बगाडाचा रथ शेत शिवारातून ओढून बावधन गावात भैरवनाथ मंदिराकडे आणला जातो. सर्व बलुतेदारांनाही यात सहभागी करून घेतले जाते. यावर्षी कोरोना निर्बंध उठल्यानंतर यात्रा होत असल्याने यात्रेसाठी हजारो भाविकांनी व यात्रेकरूंनी बगाड यात्रा पाहण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी केली आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, वाईचे पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे, डॉ शितल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, रवींद्र तेलतुंबडे, अमोल माने, कृष्णराज पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी नेमण्यात आला होता. सातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल होते. वाई-सातारा रस्त्यावर विविध खाद्य पदार्थ, खेळण्यांची दुकाने लागली. यात्रेत किरकोळ दुखापत वगळता यात्रा सुरळीत पार पडली.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |