सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर जोशीविहीर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय 45 रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धिरज पाटील (वय 38 रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारत संवाद मध्ये वितरण विभागात कार्यरत होते.
मंदार कोल्हटकर व धिरज पाटील हे आपल्या दुचाकीवरुन रस्त्याच्या डावीकडून सातार्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विजय शहा (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्या क्विड गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघेही उडून अतिशय दूर फेकले गेले. महामार्गाच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून क्विड कारही महामार्गावरील मधली लेन सोडून डाव्या लेनमध्ये येत हा अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरुनच क्विड कार चालक अनियंत्रित असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात तरुण भारत परिवारातील सदस्य, सातार्याच्या नाट्यक्षेत्रातील अनेक कलाकार यांनी गर्दी केली होती. सातार्याच्या नाट्य क्षेत्रात मंदार कोल्हटकर यांचे योगदान होते. त्याने काही चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींसाठी अभिनय केला होता.
मंदार कोल्हटकर यांच्या पश्चात आई वैजंती, पत्नी मयुरा, दोन मुले मितेश आणि मिहीर असा परिवार आहे.
धिरज पाटील यांच्या पश्चात वडील बाळासो, आई उषाताई असा परिवार आहे.
मंदार कोल्हटकर यांचा अंत्यविधी शुक्रवार दि. 19 रोजी संगममाहुली येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तर धिरज पाटील यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली याठिकाणी होणार आहे.
या दोघांच्या अपघाती मृत्यूने तरुण भारत परिवार, सातार्यातील नाट्यकर्मी व वृत्तपत्र कर्मचार्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |