सातारा : सातार्यातील एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये एकत्र काम करत असताना त्यावेळी जबरदस्तीने बलात्कार करुन त्याचा व्हिडीओ बनवून विवाहानंतर 10 लाख रुपये मागत पुन्हा शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी अशोक तुळशीदास यादव (रा.खिंडवाडी ता.सातारा) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सातार्यात खळबळ उडाली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला विवाहिता आहे. 2008 मध्ये तक्रारदार त्यावेळी सातारा एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये कामाला होती. संशयित हा त्या कंपनीमध्ये सिनीअर क्वालिटी कंट्रोल ऑफिसर होता. महिला कामाला लागल्यानंतर संशयित अशोक यादव त्या महिलेला वरिष्ठ अधिकारी असल्याने त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अशोक यादव हा वारंवार महिलेचा पाठलग करुन दुचाकीवरुन लिफ्ट देण्याचा बहाणा करत होता. अशातच त्याने लग्नाचीही मागणी घातली. वारंवार पाठलग होत असल्याने अखेर तक्रारदार महिलेने भावाला याबाबतची माहिती देवून ते दोघे संशयित अशोक यादव याला भेटले. दोघांनी भेटून लग्नासाठी नकार दिला व पुन्हा त्रास देवू नको, असेही बजावले. या घटनेनंतर त्याने चुक झाल्याचे मान्य केले पुन्हा असे करणार नाही अशी ग्वाही दिली.
संशयित अशोक यादव याने त्यानंतर महिलेला आपण मित्र राहू असे म्हणून पुन्हा पाठलग करुन त्रास देवू लागला. अखेर या घटनेमळे महिलने त्या कंपनीचा राजीनामा दिला व दुसर्या कंपनीमध्ये कामाला लागली. संशयिताने तक्रारदार महिलेची सर्व माहिती घेतली व 2010 मध्ये घरात कोणीच नसल्याचे पाहून घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग केला. हे कृत्य करताना मोबाईलवर व्हिडीओ शुटींग केले. संशयिताने ‘तु जर ही बाब कोणाला सांगितली तर हे व्हिडीओ शुटींग व्हायरल करेन,’ अशी धमकी दिली.
व्हिडीओ शुटींग असल्याचे सांगत त्याने वेळोवेळी ठिकठिकाणी बलात्कार केला. याच दरम्यान, संशयिताने लग्न केले मात्र त्याचे ते लग्न फार काळ टिकले नाही. या घटनेनंतरही तो वेळोवेळी ब्लॅकमेल करुन बलात्कार करत होता. तक्रारदार महिलनेने या कृत्यापासून सुटका करण्याची विनंती केली. या त्रासातून सुटका होण्यासाठी महिलेनेही विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र जे स्थळ येत होते त्यांना संशयित दोघांमध्ये संबंध असल्याचे सांगून तो विवाह मोडत होता. अशापध्दतीने सुमारे चार विवाह त्याने तक्रारदार महिलेचे मोडले आहेत.
अखेर संशयिताने महिलेला विवाह करण्यास सांगितले. मात्र तो जेव्हा बोलावेल तेव्हा त्याला वेळ देण्याच्या अटीवर. त्यानुसार तक्रारदार महिलेने मे 2018 मध्ये विवाह केला. या विवाहावेळी संशयिताने त्याचा भाउ शिवाजी यादव याला पाठवून तक्रारदार महिलेला निरोप दिला होता. महिलेचा विवाह झाल्यानंतर आठ दिवसातच अशोक यादव याने 10 लाख रुपयांची मागणी केली अन्यथा, तो व्हिडीओ पतीला पाठवणार असल्याची धमकी व्हाटसअप मेसेज करुन दिली.
या सर्व त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयिताची माहिती घेवून मंगळवारी रात्री उशीरा त्याला अटक केली. बुधवारी संशयित अशोक यादव याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |