RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

बारामुल्लात २ दहशतवादी ठार, इंटरनेट सेवा बंद

13 September 2018 at 17:55

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफ, राज्य पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. यानंतर ही चकमक झाली. 

चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर खबरदारी म्हणून बारामुल्ला जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसंच शाळा, महाविद्यालयंही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आणखी एका घटनेत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचा एक आणि वन विभागाचा एक असे दोन जवान जखमी झाले. जम्मूच्या काकरियालमध्ये बुधवारी सकाळी हा हल्ला करण्यात आला. यानंतर दहशतवादी पळून गेले. या घटनेनंतर कटरामध्ये सुरक्षा दलांनी अलर्ट जारी केला आहे. 

 

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट; ५२ जणांचा मृत्यू

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले.

19 hours before

अखेर टीक टॉक देशातून हद्दपार

सोशल मीडियामध्ये तुफान लोकप्रिय ठरलेल्या टीक टॉक या ॲपवर अखेर देशात बंदी घालण्यात आली आहे. तीन एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयाने टीक टॉक ॲप पोर्नोग्राफीला उत्तजेन देत असल्याचा ठपका ठेवत केद्र सरकारला त्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते.

18 April 2019 at 03:03