कोरेगाव : कोरेगाव शहरापासून साताराच्या दिशेने सहा किलोमीटर अंतरावर असणार्या दिशेने असणार्या रेल्वे फाट्यावर रेल्वे रुळावर अक्षय भाऊसो कदम (वय 25), रा. कोपर्डे, (काशीळ), ता. सातारा येथील रेल्वेच्या कामावर सुपरवायझर पदावर कामावर असणार्या युवकाचा मृतदेह छिन्न-विच्छीन्न अवस्थेत आढळला. रेल्वेच्या ठेकेदाराने रेल्वे अपघाताने युवकाचा मृत्यू झाला, अशी नोंद कोरेगाव आणि रेल्वे पोलीसांच्या दफ्तरी केली. तर कोपर्डे (काशीळ)च्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून तेथील परिस्थितीची पाहणी करुन हा अपघात नसून घातपात केला असल्याचा संशय व्यक्त करुन त्याप्रमाणे खुनाची नोंद करण्याची मागणी कोरेगाव पोलीस स्टेशनला येवून केला. त्यांची मागणी मान्य न झाल्याने मयत अक्षय कदम या युवकांच्या मृतदेहाने शवविच्छेदन (पोस्टमार्टम) कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात न करता सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला. तसेच मृत अक्षय कदम याला न्याय मिळण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांना समक्ष भेटण्याचा निर्णय काशीळ गावच्या ग्रामस्थांनी कोरेगाव पोलीस स्टेशन समोरच घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-सातारा राज्यमार्गावर तांदुळवाडी रेल्वे फाट्यावर सातारा तालुक्यातील कोपर्डे (काशीळ) गावच्या अक्षय कदम (वय 25) या युवकाचा मृतदेह रेल्वेरुळावर छिन्न विच्छीन्न अवस्थेत आढळून आला. पहाटे 5 ते सकाळी 10 च्या दरम्यान अपघात किंवा घातपात घडला असावा असा संशय परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केला. अक्षय कदम हा रेल्वे लाइन टाकण्याच्या कामावर सुपरवायझर म्हणून गेल्या आठ दिवसांपासून काम करीत होता. घटनास्थळापासून साधारण 60 फूट अंतरावर रेल्वेच्या कामासाठीचे डंपर आढळून आले. या रेल्वे फाट्यावरुन तांदूळवाडी आणि मंगळापूर येथील कृष्णा नदी पात्रातील वाळूची वाहतूक रात्रीच्या आणि पहाटेच्या अंधारात सुरु असते. या वाळू वाहतुकीसाठी कोरेगाव शहर परिसरातील वाळू तस्कर मोठया डंपर या वाहनाचा वापर करतात.
रेल्वे प्रशासन आणि कोरेगाव पोलीसांच्या दफ्तरी रेल्वेने नाकरल्याने अक्षय कदम या युवकाचा मृत्यू झाला, अशी नोंद केली आहे. मात्र दुर्घटनास्थळी पाहणी कोपर्डे गावच्या ग्रामस्थांनी केली असता रेल्वे रुळापासून 60 फूट अंतरावर एका डंपरच्या मागील चाकाखाली अक्षय कदम या मृत युवकाचे बूट सापडून आले. त्यामुळे हा अपघात झाला असावा असा संशय कोपर्डे गावच्या ग्रामस्थांनी कोरेगाव पोलीसस्टेशनचे अधिकारी यांच्याकडे व्यक्त केला. ज्या रेल्वे प्रशासनाच्या ठेकेदाराने प्रथम फिर्याद दिली त्या नलवडे या इसमाची चौकशी करण्याची मागणी केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |