03:00am | Feb 09, 2020 |
फलटण : सततच्या दारूच्या नशेत राहून घरातील लोकांना तसेच इतर नातेवाईक यांना त्रास देत असलेचा राग मनात धरून गाढ झोपेत असतानाच वडिलांनी आपल्या मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याची घटना गुणवरे ता.फलटण येथे घडली असून जन्मदात्या पित्यानेच तरुण मुलाला ठार केल्याने गुणवरे सह फलटण तालुक्यात एकच खळबळ माजली असून संशयित आरोपी लक्ष्मण बाळु नाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गुणवरे ता. फलटण येथील नाळे वस्तीवर राहणा-या सुभाष लक्ष्मण नाळे वय वर्षे 38 याचा रोजच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्याने कुऱ्हाडीचा घाव घालून मध्यरात्री खून केला असल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी की गुणवरे ता. फलटण येथील सुभाष लक्ष्मण नाळे हा दारुच्या आहारी गेला होता, दारू पिऊन घरी रोजच त्रास देने हे नित्याचेच झाले होते. या त्यांच्या त्रासाला घरातील सर्व लोक कंटाळून गेले होते, आई, वडील, पत्नी यांना रोजच मारहाण ही तो करीत होता. तसेच फोंडशिरस ता. माळशिरस येथील बहिण सुरेखा वसंत पवार यांना देखील तो सतत त्रास देत असे. सुभाष च्या या रोजच्या त्रासला सर्व घरातील मंडळी व नातेवाईक मंडळी कंटाळली होती,या मुळे ही घटना घडली असल्याची चर्चा सुरू होती.
शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वडील लक्ष्मण नाळे यांनी मुलगा सुभाष नाळे झोपेत असताना कु-हाडीने घाव घालून गंभीर दुखापत करून त्यास जीवे मारले असल्याची तक्रार शंकर बाळू नाळे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली आहे. या घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटना स्थळी भेट दिली यावेळी फलटण ग्रामीण चे पोलीस निरीक्षक नितीन सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी संशयिति आरोपी लक्ष्मण नाळे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संजय बोंबले करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |