11:04am | Nov 11, 2019 |
सातारा : सुमारे चार दिवसांपूर्वी बरड ता. फलटण येथून भंगाराचे सामान घेऊन निघालेला ट्रक चार दिवस होऊनही निश्चितस्थळी पोहचला नसून ट्रक आणि ट्रान्सपोर्ट मालकाच्या संगनमताने सातारा शहरात सुमारे २५ लाख किमतीचे भांगराचे सामान लपवून ठेवल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, बरड ता.फलटण येथील एका बंद असलेल्या ग्रीन हाऊस साईटवरून गेल्या आठवड्यापासून सुमारे तीन ट्रक भांगराचे सामान बंगलोर येथील एका कंपनीला विकले आहे. त्यापैकी दोन ट्रक भंगाराचे सामान बंगलोर येथे पोहचले असून सातारा येथील जगताप नावाच्या ट्रान्सपोर्ट मालकाने ट्रकचालकाशी संगनमत करून सुमारे २५ लाख किमतीचे भंगाराचे सामान असलेला ट्रक सातारा शहरात लपवला आहे. याबाबत बरड येथील संबंधित ग्रीन हाउस साईटचे व्यवस्थापक श्री.कदम यांनी ट्रान्सपोर्ट मालक जगताप यांच्याशी संपर्क साधला असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर या ट्रकचे तुम्ही दिलेले भाडे मला परवडत नाही असे कदम यांना सांगितले यानंतर कदम यांनी तुम्हाला ट्रकचे भाडे परवडत नसेल तर भंगाराचे सामान पुन्हा साईटवर टाकायला ट्रान्सपोर्ट चालक जगताप यांना सांगितले. परंतु जगताप यांनी उलट कायदा धाब्यावर बसवून गेल्या तीन दिवसांपासून संबंधीत भंगाराचा ट्रक सातारा शहरात लपवून ठेवून कदम यांनाच काही रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास सुमारे २५ लाख किमतीचे भंगाराचे सामानाचा ट्रक गायब करण्याची धमकीही जगताप यांनी कदम यांना दिली आहे. याबाबत कदम यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता फलटण ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली असल्याची माहिती ग्रीन हाउस साईटचे व्यवस्थापक कदम यांनी दिली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |