11:17am | Apr 25, 2024 |
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा तालुक्यामध्ये कोट्यवधीची कामे झालेली आहेत, हीच आपली जमेची बाजू असून कार्यकर्त्यांनी झालेला विकास जनतेपर्यंत पोहोचवावा असे आवाहन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. शेंद्रे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोनगाव येथील सप्तपदी कार्यालयात झाला. या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला महायुती व मित्रपक्षाचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, माजी सभापती सुनील काटकर, अरविंद चव्हाण, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, विजय पोतेकर, संपतराव साळुंखे, सुरेंद्र देशपांडे, संजय पोतेकर, सूर्यकांत पडवळ, विश्वास नावडकर, प्रशांत पोतेकर, सुनील जाधव, संजय साळुंखे, अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, नामदेव नावडकर, एडव्होकेट अंकुश जाधव, मोहनराव साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार उदयनराजे पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात घोषणा कमी झाल्या, पण विकास कामे प्रचंड झाली. आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि माझ्या माध्यमातून झालेली विकास कामे सर्वांना माहितीच आहेत. आपल्या भागाचा विकास आणखी गतीने करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. येणाऱ्या सर्वच निवडणुकांत आपण भाजप सोबत राहून विकास करून घेणार आहोत.
सुनील काटकर म्हणाले, विकास कामे करण्यासाठी दोन्ही राजे सक्षम आहेत त्यांनी शेंद्रे गटाला भरभरून दिले आहे. उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीत उच्चांकी मतदान करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करू. आता सारखे नियोजन विधानसभा निवडणुकीतही करूया.
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये ताकदीने भाजपचे काम सुरू आहे. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून एक लाखांच्या वर लीड उदयनराजेंना द्यायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. यावेळी माजी सभापती अरविंद चव्हाण, सूर्यकांत पडवळ, विक्रम पवार आदींनी मार्गदर्शन केले.
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |