RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

विनाशकारी, भयंकर सूरत अग्नितांडव; बॉलिवूडकरांनी व्‍यक्‍त केले दु:ख

27 May 2019 at 18:15

अहमदाबाद : गुजरातची व्‍यापारी राजधानी सूरत येथे तक्षशिला कोचिंग सेंटरमध्‍ये लागलेल्‍या आगीत २० विद्‍याथृयांचा मृत्‍यू झाला आहे. ही दुर्देवी घटना शुक्रवारी चार मजली व्‍यावसायिक इमारतीत घडली. याप्रकरणी सूरत पोलिसांनी कोचिंग सेंटरचे संचालक भार्गव बुटानी आणि इमारतीचे दोन बिल्डर्सविरोधा एफआयआर दाखल केले आहे. त्‍यानंतर कोचिंग सेंटरच्‍या संचालकाला अटक करण्‍यात आली आहे. 

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन, जावेद अख्तर आणि श्रद्धा कपूर यांनी सूरत अग्नितांडवातील मृत्‍यूमुखी पडलेल्‍या मुलांच्‍या कुटुंबीयाप्रती दु:ख केले. 

या दुर्दैवी घटनेवर सोनू सूद, सुनील ग्रोवर, भूमि पेडनेकर याबॉलिवूड सेलेब्सनी ट्‍विट करून दु:ख व्‍यक्‍त केले. 

अमिताभ बच्चन : सूरतमध्‍ये भयानक शोकांतिका. एक विनाशकारी आग आणि या आगीम होरपळणारे १४-१७ वर्षांच्‍या मुलांचा मृत्‍यू इमारतीवरून उडी मारल्‍याने झाली. हे दु:ख अभिव्यक्तीच्‍या पलीकडे आहे. त्‍यांच्‍यासाठी प्रार्थना.

जावेद अख्तर : ही वास्तवात भयंकर दुर्घटना आहे. सूरतमध्‍ये १७ तरुण मुलांचा मृत्‍यू आगीत होरपळल्‍याने झाला. त्‍यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्‍या प्रती माझ्‍या संवेदना. आमच्‍या देशातील सर्व शहरांच्‍या नगरपालिकंना आगीपासून सुरक्षेचे नियमांचे पालन करण्‍यासाठी प्रत्येक इमारतीसाठी नियम, उपाययोजना आवश्‍यक आणि सक्‍तीचे असायला हवेत. 

शत्रुघ्न सिन्हा : हे दु:ख शब्दांच्‍या पलीकडे आहे. सूरतच्‍या सरथाणामध्‍ये एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्‍ये आग लागण्‍याच्‍या भयंकर आणि दुर्भागयपूर्ण घटनेपेक्षा खूपच दुखी आहे. १५ पेक्षा अधिक लोक मारले गेले. त्‍यामध्‍ये अधिकतर तरुण होते. त्‍यांच्‍याप्रती माझ्‍या संवेदना आणि प्रार्थना. ज्‍यांनी आपल्‍या प्रिय लोकांना या घटनेत गमावले. दु:खद!

गुरु रंधावा : सूरतमधील सर्वांसाठी प्रार्थना. पीडित कुटुंबीयांना परमेश्‍वर आशीर्वाद देवो.

अशोक पंडित : सूरत अग्नी दुर्घटनेत ज्‍यात १९ जणांचं आयुष्‍य बर्बाद झालं. हे दृश्य पाहून दु:खी आणि व्यथित आहे. ईश्‍वर त्‍या लोकांच्‍या कुटुंबीयांना शक्‍ती देवो. ज्‍यांनी आपल्‍या प्रिय लोकांना गमावलं. आणि जे जखमी झाले आहेत, ते लवकर ठिक होवो.