RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

खा. उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय उध्दव ठाकरेच घेतील : नितीन बानुगडे-पाटील

13 September 2018 at 00:29

सेनेत फक्त पक्ष आदेशच मानला जातो

कराड : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी द्यायची का नाही? हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकारही त्यांनाच असल्याचे शिवसेनेचे सातारा-सांगली जिल्हा संपर्क प्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, खा. उदयनराजे यांच्या विरोधात लोकसभेसाठी शिवसेनेने आपणास उमेदवारी दिल्यास आपण उभे राहणार का? या प्रश्नावर त्यांनी सेनेत फक्त आदेश मानला जातो, सुचक विधान केले. अप्रत्यक्षपणे पक्षादेश झालेतर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत बानुगडे-पाटील यांनी दिले.

यावेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम, चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, कराड दक्षिण तालुका प्रमुख नितीन काशिद, शशिकांत हापसे, शशिकांत करपे उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीकडून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप केला होता. शिवाजी महाराजांवरील निष्ठेपोटी त्यांचे वारसदार म्हणून उदयनराजे यांना दिल्लीत पाठवले पाहिजे. त्यांच्या विरोधात कोणत्याच पक्षाने उमेदवार देऊच नये, असे व्यक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना बानुगडे-पाटील म्हणाले, शिवसेना हा पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणार पक्ष आहे. उमेदवारी व पक्ष प्रवेशाबाबतचे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात. त्यामुळे खा. उदयनराजे यांच्या बद्दलचा पक्ष प्रवेश असो वा उमेदवारी संबंधीचा कोणताही निर्णय घ्यायचा असेलतर तो पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेच घेतली. शिवसेने होऊ घातलेली निवडणूक स्वबळावर लढवण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पक्ष तयारीला लागला आहे. बुथ, गट व विधानसभा मतदार संघनिहाय नियोजन पूर्ण केले आहे.

 काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. असे असतानाही गेल्या काही निवडणुकात भाजपने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र शिवसेना पक्ष येथे कोठेही दिसून येत नाही. यावर बोलताना बानुगडे-पाटील यांनी विषयाला बगल देत भविष्यात शिवसेनेचे संघटन ग्रामपंचपयतींसह, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह सर्वच स्तरावर दिसेल असे त्यांनी सांगितले.


'पिटबुल' चोरणारे दोन अल्पवयीन ताब्यात

येथील गोडोली परिसरातून पिटबुल या अमेरिकन ब्रीडचे साठ हजार रुपये किमतीचे श्वान चोरीला गेले होते .

9 minutes before

स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी

सातारा शहर व परिसरात स्वाईन फ्ल्यूचा विळखा वाढला आहे. महिन्याभराच्या कालावधीत स्वाईन फ्ल्यूचे 10 बळी गेल्यानंतरही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे.

17 minutes before

वाठारकर व सुर्यवंशी यांनी केला २५० कोंटीचा अपहार : याचिकाकर्ते राजेंद्र पाटील यांचा आरोप

कराड जनता बँकेतील संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे बँकिंग क्षेत्रातील कराडची विश्वासहर्ता संपली आहे. बँकेच्या नावात कराड असल्यामुळे अनेक आर्थिक संस्थांमधील आपल्या ठेवी काढून घेऊ लागले आहेत.

26 minutes before

गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर सुरुची राडा प्रकरणातील आजी-माजी नगरसेवकांसह १७३ जण हद्दपार

173 संशयितांना गणेशोसत्व होईपर्यंत सातारा तालुक्‍यातून हद्दपार केले आहे.

15 hours before