इंदोर : मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात शुक्रवारी एक हृदयद्रावक तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली. खेळता-खेळता एका गाडीमध्ये अडकलेल्या तीन चिमुकल्यांचा श्वास गुदरमरून मृत्यू झाला. हे तिघेही सख्खे भाऊ-बहिण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलांची ओळख पूनम (६ वर्ष), बुलबुल (४ वर्ष) आणि प्रतिक (३ वर्ष) अशी पटली. तीनही मुलं सकाळीच खेळण्यासाठी बाहरे पडले होते. शेजारीच्या एका रिकाम्या जमिनीवर उभ्या असलेल्या एका कारमध्ये हे तिघेही बहिण-भाऊ खेळता-खेळता शिरले. या गाडीचा दरवाजा आतून बंद झाला आणि त्यातून बाहेर कसं पडावं हे या मुलांना लक्षात आलं नाही.
गाडी आतून लॉक झाल्यानं तिनही मुलं आत अडकली होती. जवळपास तीन तास ते गाडीच्या आत होते परंतु, त्यांना दरवाजा उघडता आला नाही.
ही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं. बऱ्याच वेळानंतर तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीचं लक्ष या गाडीवर पडलं आणि आत मुलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आरडा-ओरडा करत त्यांनी आजुबाजुच्या लोकांच्या मदतीनं तीनही मुलांना बाहेर काढलं. तीनही मुलं निपचीत पडली होती. बेशुद्धावस्थेतच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |