RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

महाबळेश्‍वरमध्ये दोन युवकांना बेदम मारहाण

30 December 2018 at 13:44

महाबळेश्वर : रस्त्यात वाहतुकीवरून झालेल्या किरकोळ कारणावरून रांजणवाडी येथील सातजणांनी भिलारच्या रोहन भिलारे व रोहित भिलारे या दोन युवकांना लोखंडी रॉड, काठी व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला. यापैकी चारजणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या चार युवकांना महाबळेश्वर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

भिलार येथील दोन युवक आपल्या वाहनाने महाबळेश्वरला येत होते याचदरम्यान समोरून एक भरधाव वाहन आल्याने भिलारे बंधूंना अर्जंट ब्रेक मारावा लागला़ अर्जंट ब्रेक मारल्याने झालेल्या आवाजाने भिलारे बंधूंच्या पुढे असलेल्या मोटार सायकल स्वारांचे लक्ष विचलित झाल्याने  ते चिडले व त्यांनी भिलारे बंधूंना शिवीगाळ केली. त्यानंतर भिलारे बंधू तेथून निघून गेले. त्यानंतर त्या मोटार सायकलस्वारांनी इतर पाच लोकांना बोलावून घेवून त्यांनी  लिंगमळा परिसरात भिलारे बंधूंचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबले नाहीत. त्या युवकांनी पाठलाग करून भिलारे बंधूंना बेदम  मारहाण केली तसेच त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. 

याप्रकरणी भिलारे बंधूंनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात सात जणां विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी रांजणवाडी येथील जुनैद याकुब वारूणकर 28, जुबेर याकुब वारूणकर 26, असलम याकुब वारूणकर 22  व अब्दुल मजीद वारूणकर  व इतर तीन अशा सात जणांवर गुन्हा नोंद करून चौघांना अटक केली. अन्य तीघांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान शनिवारी चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पो. हवालदार श्रीकांत कांबळे करत आहेत.  

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before