07:06pm | Jun 15, 2018 |
सातारा : सातारा महसूल विभागातील कर्मचारी व अधिकार्यांची खाबुगिरी ‘सातारा टुडे’ने सातत्याने चव्हाट्यावर आणली आहे. असे असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये महसूल विभागातील खाबुगिरी करणारे कर्मचारी सातत्याने लाचलुचपत विभागाच्या रडारवर आले आहेत. आज दुपारी एक हजाराची लाच स्विकारताना निंबळकचा तलाठी दुसर्यांदा सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडला गेला आहे.
सातारा जिल्हा महसूल विभागाच्या आब्रुची लक्तरे वेगवेगळ्या विषयातून रोजच वेशीवर टांगली जात आहेत. ‘आम्ही मोठे साव’ अशा तोर्यात वागणार्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर सातत्याने येत आहेत. गेल्या वर्षभरात सर्वाधिक लाचखोर विभाग हा महसूल विभाग ठरला आहे. गावठाणमधील खरेदी केलेल्या जागेच्या दस्ताची नोंद करुन देण्यासाठी निंबळक, ता. फलटण येथील तलाठी श्रीमंत दिनकर रणदिवे (वय 47, रा. प्लॉट नं. 6 तनय प्लाझा अपार्टमेंट, लक्ष्मी नगर फलटण) याने एका तक्रारदार महिलेला लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजार रुपयाची लाच देण्याचे संबंधित महिलेने कबुल केले. त्यानंतर संबंधित तक्रारदार महिलेने याबाबतची तक्रार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे व कर्मचार्यांनी सापळा लावला होता. यातील संशयित आरोपी तलाठी श्रीमंत दिनकर रणदिवे याला आज दुपारी एक हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात अडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लाचखोर तलाठी रणदिवे याला 2012 साली लाच स्विकारताना सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. याबाबतचा खटला न्यायालयात प्रलंबित असतानाही लाचखोर तलाठी रणदिवे याने यापूर्वी झालेल्या घटनेतून कोणताही बोध न घेता पुन्हा लाच स्विकारल्याने जिल्हा महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोद झालेला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |