03:31am | Dec 04, 2018 |
कराड : राज्यातील साखर कारखानदारीत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे योगदान महत्वाचे असून सहकारी साखर कारखानदारीला कृष्णा कारखाना दिशादर्शक आहे. कारखान्याची होत असलेली सर्वांगिण प्रगती ही कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे येथील कृषी व तंत्रज्ञान संचालक व निवृत सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, शास्त्रज्ञ डॉ.जुगल रेपाळे,जनसंपर्क अधिकारी राजेंद्र भोईटे यांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळ, कारखान्याचा जीवाणू खत प्रकल्प, कारखाना संचलीत जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयास भेट दिली. तसेच कारखान्याचे जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत सहभागी सभासद व प्रगतशील शेतकरी संतोष शिंदे यांचे बोरगांव येथील व्हि.एस.आय. 8005 ऊस क्षेत्रास भेट देवून ऊसपिकाची पाहणी केली.
कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी गेली तीन वर्षापासून कारखाना राबवित असलेल्या सभासद हिताच्या योजनांची माहिती, जयवंत आदर्श कृषि योजनेअर्तंगत जीवाणू खत प्रकल्प उभारणी व एकरी 100 टन उत्पादन वाढ योजनेची माहिती या शिष्टमंडळास दिली. यावेळी व्हा.चेअरमन जगदिश जगताप, माजी व्हा.चेअरमन लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, पांडुरंग होनमाने, अमोल गुरव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, ब्रिजराज मोहिते, गिरीश पाटील, सुजित मोरे, शिवाजीराव जाधव, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, मनोज पाटील, प्रमोद शिंदे, सर्व अधिकारी व शेतकरी सभासद उपस्थित होते. विकास देशमुख यांनी ऊस लागण हंगामाबाबत आङसाली ऊस लागण न करीता जून जुलै महिन्यामध्ये हिरवळीची पिके घेऊन पुर्व हंगामी व सुरु हंगामामध्ये उस लागण करणेचे अवाहन केले व तसेच पाणी व खतांची बचत करणेसाठी ठिबक सिंचन काळाची गरज असल्याचे सुचित करत कारखान्याच्या विविध प्रकल्पांच्या भेटीनंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, उसविकास अधिकारी पंकज पाटील, सहा.उसविकास अधिकारी शिवाजी बाबर, जीवाणू खत प्रकल्प अधिकारी डॉ. विजय कुंभार, आदीसह सर्व अधिकारी, सभासद उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |