कराड : घोणशी गावाला पूर्वीपासून एक चांगली परंपरा आहे. हे गाव विकासाच्या बाजूने उभे राहणारे गाव आहे. परिसराची गरज व ग्रामस्थांची आग्रही मागणी यामुळे या परिसरात लाखो रुपयांची विकासकामे मार्गी लागली. यापुढेही या परिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून ग्रामस्थांनी विकासाच्या मुद्यावर एकञित येऊन परिसराचा विकास साधावा असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
घोणशी (ता.कराड) येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमीपूजन व उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील - चिखलीकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, सह्याद्रीचे संचालक माणिकराव पाटील, अमित जाधव, उदयकुमार पाटील, आनंदराव पिसाळ, पंकज पिसाळ आदींची उपस्थिती होती.
यावेळी मनोहर शिंदे म्हणाले, घोणशी गावाला पक्ष निष्ठेची परंपरा आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी विकासाच्या मुद्यावर एकञित येऊन परिसरात मोठी विकासकामे केली आहेत. पंकज पिसाळ व त्यांचे सर्व सहकारी सातत्याने नवनवीन विकासकामांसाठी आग्रही असतात. त्यामुळेच येथे लाखो रुपयांची विकासकामे मार्गी लागली असल्याचे दिसते आहे. परिसरातील ग्रामस्थांनी यापुढेही आपापसातील मतभेद विसरून गावचा विकास साधावा.
यावेळी अजित पाटील - चिखलीकर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. स्वागत उदयकुमार पाटील यांनी केले. प्रास्ताविक विजय माने यांनी केले. शेवटी युवा नेते पंकज पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास बापूराव सुतार, हणमंत भोपते,मानसिग पिसाळ, अशोक पिसाळ, रामचंद्र पिसाळ, विनायक पिसाळ, सुनील पिसाळ, गणेश थोरात, विलास रघुनाथ पिसाळ, आनंदराव वायदंडे, कृष्णत वायदे, डॉ. शशीकांत वायदंडे, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |