03:06pm | Jan 21, 2019 |
सातारा : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला अट्टल गुन्हेगार चांद जालिंदर पवार याच्या सांगवी, ता. फलटणच्या हद्दीमध्ये डीवायएसपी पथकाने सापळा रचून मुसक्या आवळल्या असून चांद याच्या अटकेमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांना चांद जालिंदर पवार (वय 19) रा. बडेखान, ता. फलटण हा अट्टल गुन्हेगार फलटणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी पथकाने सांगवी, ता. फलटण हद्दीमध्ये असलेल्या हेरिटेज दूध डेअरीजवळ सापळा रचला होता. त्यानुसार काल दि. 20 रोजी सायंकाळी चार वाजता बारामतीकडून फलटणच्या दिशेने दुचाकीवरुन जात असताना चांद पवार याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कमरेला कुकरी हे तीक्ष्ण हत्यार असल्याचे आढळले. हे हत्यार पोलिसांनी जप्त केले. चांद याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर लोणंद, फलटण शहर, ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गंभीर गुन्ह्यांची त्याने कबुली दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून चांद पवार सातारा पोलिसांना हवा होता. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे तपासकामात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र काल डीवायएसपी पथकाने चांद पवारच्या मुसक्या आवळल्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे.
या कारवाईमध्ये फलटण डीवायएसपी पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल गायकवाड, पो. ना. देशमुख, पो. कॉ. नितीन चतुरे, सुजित मेंगवडे यांनी सहभाग घेतला होता. या पथकाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उप अधीक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |