मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा मतदारसंघाच्या जागेची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फलटणमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी शेखर गोरे समर्थकांनी राडा केला होता. आता शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीवेळी दुसर्यांदा राडा झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र फोल ठरले आहे.
याआधी लोकसभा निवडणूक 2019च्या निमित्ताने माढा मतदारसंघाच्या जागेची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फलटणमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी शेखर गोरे समर्थकांनी राडा केला होता. त्या राड्याचा मुहूर्त चुकला हे मानून शरद पवारांनी माढ्यातील आपली उमेदवारी रद्द केली होती. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. या सगळ्या राड्यामुळे काही काळ राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर तणावाचं वातावरण तयार झाले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक बोलावली आहे. बैठीकवेळी मुंबईच्या राष्ट्रवादी भवना समोर गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचे समर्थक आपसात भिडले. लोकसभा निवडणुकीत परभणीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा नेमका कुणामुळे पराभव झाला, या मुद्यावरुन कार्यकर्त्यांमध्ये ही वादावादी झाली आहे. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद निवळला.
लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागात राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. उस्मानाबाद, परभणी, बीड लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद असून पक्षाला लोकसभेला यश मिळवता आलं नाही. त्यातच बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षातील अंतर्गत कलहावर टीका करत शिवसेनेत प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थिती होत असलेल्या राष्ट्रवादीच्या या बैठकीत मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |